बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने (Ranveer Singh) जेव्हा आपला नवी जाहिरात सर्वांसमोर आणली तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. सेक्शुअल वेलनेस ब्रँडची जाहिरात करताना रणवीर सिंगने अ‍ॅडल्ट स्टार जॉनी सिन्सशी (Adult star Johnny Sins) हातमिळवणी केली. दोघांना एकत्र पाहिल्यानंतर नेटकरी आश्चर्यचकित झाले होते. या जाहिरातीमधून पुरुषांच्या लैंगिक समस्यांवर भाष्य करण्यात आलं आहे. दरम्यान जॉनी सिन्सने एका मुलाखतीत भारतात काम करण्याचा अनुभव मांडला आहे. आपण सर्वांनी स्वागत केल्याचं त्याने म्हटलं. यावेळी त्याने आपली इच्छा असतानाही भारताला जवळून अनुभवता न आल्याची खंतही व्यक्त केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणवीर सिंग आणि जॉनी सिन्सची ही जाहिरात अनेकांना आवडली. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा क्रॉसओव्हर असल्याची कमेंट अनेकांनी केली. युट्यूबर तन्मय भटला दिलेल्या मुलाखतीत जॉनी सिन्सने आयुष्यात पहिल्यांदाच इतक्या लोकांसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला. तो म्हणाला की, "हे थोडं अवघड आहे, कारण तुम्ही दूरपर्यंत प्रवास करत अशा ठिकाणी आलेले असता ज्या ठिकाणचा अनुभव घेण्याची तुम्हाला नेहमी इच्छा असते. येथील लोक फारच चांगले आहेत".


पुढे तो म्हणाला की, "प्रत्येकजण फारच चांगला असून, मी आतापर्यंत जो काही अनुभव घेतला तो चांगला आहे". तन्मयने यावेळी सेटवर 150 लोकांसह काम करण्याच्या अनुभवाबद्दलही जॉनी सिन्सला विचारलं. त्यावर तो म्हणाला की, "मला वाटत नाही मी आजपर्यंत इतके लोक सेटवर पाहिले आहेत. अमेरिकेत मी सर्वात जास्त 15 लोकांना सेटवर पाहिलं असेल. माझ्या अनेक शूटमध्ये मी आणि तरुणी इतकेच असतो. अनेक शूटमध्ये तर 3 ते 5 लोकच असतात".


देशातील पहिल्या क्रमांकाचा सेक्सुअल हेल्थ अँड वेलनेस ब्रँड बोल्ड केअरने आपली खास मोहीम #TakeBoldCareOfHer च्या लाँचिगची घोषणा केली आहे. रणवीर सिंह सह-संस्थापक म्हणून त्यांच्याशी जोडला गेला आहे. रणवीर गेल्या वर्षभरापासून ब्रँडसह काम करत असून या मोहिमेअंतर्गत पुरुषांची लैंगिक समस्या ही सामान्य बाब असून त्यावर चर्चा केली जावी असा प्रयत्न आहे. याचसाठी त्यांनी एक जाहिरात शूट केली असून यामध्ये टीव्हीवरील कौटुंबिक मालिकेची पार्श्वभूमी वापरण्यात आली आहे. टीव्ही मालिकेतील पात्र दाखवत यामध्ये अभियनातील अतिशयोक्ती दाखवत उपहासात्मकपणे मुद्द्यावर भाष्य करण्यात आलं आहे. अभिनेत्री रश्मी देसाई जाहिरातीवर संतापली असली तरी अनेक बॉलिवूड आणि टीव्ही सेलिब्रिटींनी जाहिरातीचं कौतुक केलं आहे. करण कुंद्राने तर सर्वात जाहिरातींचा बाप अशा शब्दांत स्तुती केली आहे.