मुंबई : 'हिरो नंबर 1' म्हणून हिंदी कलाविश्वात वेगळी ओळख प्रस्थापित करणारा अभिनेता गोविंदा सध्या सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहे. निमित्त ठरत आहे ते म्हणजे त्याने नाकारलेल्या एका ह़लिवू़डपटाचं. 'अवतार' हा प्रचंड गाजलेला आणि प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा चित्रपट आपण नाकारल्याचं सांगत गोविंदाने जणू स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेटकऱ्यांनी त्याच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत त्याची खिल्ली उडवण्यास सुरुवातही केली आहे. एका अर्थी गोविंदासुद्धा सोशल मीडिया ट्रोलिंगचा शिकारच झाला आहे, असं म्हणायला हरकत नाही.  याच ट्रोलिंगमध्ये त्याचे काही विनोदी मीम्स शेअर करत गोविंदाने चूक केल्याचं नेटकरी म्हणत आहेत. 





नुकतच एका टीव्ही शोमध्ये त्याने आपण जेम्स कॅमरुनचा हा चित्रपट नाकारल्याचं सांगितलं. ४१० दिवसांमध्ये चित्रपट पूर्ण करण्यासाठीचा पुरेसा वेळ नसल्याचं कारण देत त्याने हा प्रस्ताव नाकारला होता. हे कारण पाहता, नेटकऱ्यांनी त्याची खिल्ली उडवणारे मीम पोस्ट करण्यास सुरुवात केली. 



चित्रपट नाकारण्याचं आणखी एक कारण गोविंदाने सांगितल्याचं कळत होतं. ज्यामध्ये अंगावर रंग लावून घेण्यासाठी आपण तयार नसल्याचं त्याने सांगितलं होतं. इतक्यावरच न थांबता जेम्स कॅमरुन यांचा हा चित्रपट साकारण्यासाठी ८-९ वर्षांचा कालावधी लागण्याची भविष्यवाणीही त्याने केली होती. शिवाय चित्रपटाच्या यशाचं भाकितही केलं होतं. गोविंदाने इतक्यावरच न थांबता या चित्रपटाचं नावही आपणच सुचवल्याचं सांगितलं. ज्यामुळे सोशल मीडियावर त्याच्याविषयी व्हायरल होणारे धमाल मीम्स थांबण्याचं नाव घेत नाही आहेत.