मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या अनेक ऐतिहासिक विषयांवर आधारलेले चित्रपट साकाराण्यात येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणापासूनच त्यांच्यासोबत असणाऱ्या तानाजी मालूसरेंच्या यशोगाथेवर बेतलेला चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात वीर योद्धा तानाजी मालूसरे यांच्या भूमिकेत अभिनेता अजय देवगण झळकणार आहे. नुकताच चित्रपटाचा अभिनेता आणि निर्माता अजयने चित्रपटा बद्दल एक महत्वाची घोषणा केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले 'तानाजी : द अनसंग वॉरियर' चित्रपट यावर्षी नोव्हेंबर मध्ये प्रदर्शित होणार नसून पुढील वर्षी १० जानेवारी २०२० मध्ये चित्रपटगृहात दाखल होणार आहे. अजयने ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांना ही बातमी कळवली. याव्यतिरिक्त चित्रपटात अभिनेत्री कजोल सुद्धा झळकणार आहे. २००८ मध्ये 'यू मी और हम' चित्रपटात दोघे एकत्र दिसले होते. तब्बल ११ वर्षांच्या कालावधीनंतर कजोल मोठ्या पडद्यावर अभिनय करताना दिसणार आहे.  चित्रपटाचे दिग्दर्शन ओम रावत करणार आहेत.



महत्वाची गोष्ट म्हणजे, दीपिका पादुकोनचा ‘छपाक’ चित्रपट सुद्धा १० जानेवारी २०२० रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. 'छपाक' चित्रपट ऑसिड पिडीत लक्ष्मी अग्रवालच्या आयुष्यावर बेतलेला आहे. १० जानेवारी २०२० मध्ये बॉक्स ऑफिसवर दोन्ही चित्रपटांमध्ये कमालीची टक्कर बघायला मिळणार आहे. तर कोणता चित्रपट बाजी मारेल हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे