साथ निभाया साथिया या मालिकेला प्रेक्षकांनी भरपुर पसंती दिली होती. यातील प्रत्येक पात्र आजही या मालिकेतील पात्रांच्या नावाने ओळखली जातात. अहम मोदी, गोपी बहू, राशि बेन आणि कोकिला मोदी ही पात्र आजही सर्वांच्या लक्षात आहेत. यामध्ये गोपी बहु ही तीच्या सरळ साध्या अभिनयाने खुप गाजली होती. गोपी बहु हे पात्र साकारणारी जिया मानेक ही अभिनेत्री  आहे. 2010 मध्ये ही मालिका सुरु झाली होती. आज 14 वर्षानंतर गोपी बहुचा हा नवीन लुक तीच्या चाहत्यांना वेड लावणारा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


जिया मानक अभिनय क्षेत्रापासुन लांब जरी असली तरी ती सोशल मिडीयावर जास्त अॅक्टिव आहे. तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मिडीयावर खूप गाजत असतात. तिचे मिलियन्सच्या वर सोशल मिडीयावर फॉलोवर्स आहेत. 


नुकतचं तिने सोशल मिडियावर शेअर केलेला फोटो हा खुप व्हायरल होत आहे. यात ती ओळखूनही येत नाही  आहे. या फोटोत तीने लाल रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस घातला आहे. मोकळे केस आणि कानात मोठे ईअरिंग्समुळे गोपी बहु खूप मॉर्डन दिसत आहे. 


तिच्या या पोस्टवर चाहते कमेंट्स करुन तीचं कौतुक करत आहेत.