अरेरे ! वीस वर्षांनंतर हे चॅनल होतयं बंद
साधारण २० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी फेसबुक आणि यु ट्यूब नव्हते. पण एक असे चॅनेल होते, जे मनोरंजनाची कमी भासू देत नव्हते.
मुंबई : साधारण २० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी फेसबुक आणि यु ट्यूब नव्हते. पण एक असे चॅनेल होते, जे मनोरंजनाची कमी भासू देत नव्हते.
दोन दशके राज्य
चॅनल व्ही ने गेली दोन दशके तरुणांच्या मनावर राज्य केले. मनोरंजनासाठी लागणार प्रत्येक प्रकारचा कंटेंट चॅनल व्हीने चाहत्यांसमोर आणला. यामध्ये नवीन गाणी, नवे शो आणि सेलिब्रिटीजचा राबता नेहमी असायचा.
पण आता बातमी अशी आहे की चॅनल व्ही बंद होणार आहे.
हे चॅनल इंटरनॅशनल म्यूजिकल चॅनल फॉक्स नेटवर्क ग्रुपचा हिस्सा आहे.
हॉंगकॉंग ,मलेशिआत स्टुडिओ
१९९४ ते २००२ पर्यंत चॅनल व्ही चा स्टुडिओ हाँगकाँगमध्ये होता.
तर काही दिवसांकरिता स्टुडिओ मलेशियामध्ये देखील हलविण्यात आले.
चॅनलवर हिंदी आणि इंग्रजी दोन्ही कंटेट पाहायला मिळतात.
व्ही ऐवजी कन्नड स्पोर्ट्स
असे म्हटले जात आहे की चॅनेल व्हीऐवजी, स्टार इंडियातर्फे एक कन्नड स्पोर्ट्स चॅनल सुरू करणार आहे.
टीआरपी घटला
लोकप्रियता कमी झाल्याने चॅनेल बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. २०१५ पासून चॅनेलची टीआरपी कमी होत आहे.
चाहते भावूक
आता चॅनेल बंद होण्याची बातमी आल्याने व्ह्यूअर्स भावूक झाले आहेत.
यासंबंधी सोशल मीडियावर चाहते ट्विट्स करत आहेत.