Anil Kapoor Nayak 2 : बॉलिवूडचे लोकप्रिय अभिनेते जे वयाच्या 67 व्या वर्षी देखील तरुणांना फिटनेटमध्ये मागे टाकतात ते म्हणजे अनिल कपूर. अनिल कपूर यांचा या वयातील फिटनेस हा उल्लेखणीय आहे. अनिल कपूर यांनी आजवर अनेक चित्रपट केले. त्यातील वेगवेगळ्या धाटणीतील त्यांच्या भूमिका या तर प्रत्येकवेळी प्रेक्षकांच्या मनावर नवी छाप सोडताना दिसल्या. त्यापैकी त्यांची 'नायक' या चित्रपटातील भूमिका आहे. हा अनिल कपूर यांचा आयकॉनिक ठरलेला चित्रपट आहे. अनिल कपूर यांनी या चित्रपटात शिवाजी राव गायकवाड ही भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्यांच्या पॉलिटीकल स्टेटमेंटसाठी त्यांची आजही आठवण करण्यात येते. आता अशी चर्चा आहे की या चित्रपटाचा दुसरा भाग येणार आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनिल कपूर यांच्या 'नायक' या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच सिक्वेल येणार आहे. 'पिंकव्हिला'च्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाचं नाव हे 'नायक 2' असं असेल. तर या पठाण चित्रपटाचा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या बॅनर खाली हा चित्रपट बनवण्यात येणार आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन मिलन लुथरिया करणार आहे. 



कोण आहे मिलन लुथरिया?


मिलन लुथरिया विषयी बोलायचे झाले तर त्यांनी 'द डर्टी पिक्चर', 'कच्चे धागे' आणि 'वंस अपॉन अ टाइम इन मुंबई' सारखे चित्रपट बनवले आहेत. रिपोर्ट्समध्ये हे देखील सांगण्यात येत आहे की 'नायक 2' साठी मिलन यांच्यासोबत चित्रपट लेखक रजत अरोरा मिळून काम करणार आहेत. ज्यांनी 'द डर्टी पिक्चर' आणि 'किक' सारख्या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. मिलन आणि रजत यांची एकत्र अशी जोडी चांगलीच हिट आहे.


हेही वाचा : रमजानमध्ये रोजा नाही ठेवत! वक्तव्यानंतर उर्फी जावेद कट्टरपंथीयांच्या निशाण्यावर


'नायक 2' या चित्रपटा विषयी बोलायचे झाले तर तब्बल 24 वर्षांनंतर याचा दुसरा भाग येतोय. त्यामुळे आता या चित्रपटात आधीची कास्ट असेल की नाही याची शक्यता फार कमी आहे. मात्र, त्याच आयडीयावर पुढे हा चित्रपट बनवण्यात येईल असं सगळ्यांना वाटतंय. प्रेक्षकांची इच्छा आहे की हा चित्रपट आधी प्रमाणेच पॉलिटिकल सिस्टमवर आधारीत असायला हवी. आता यात अनिल कपूर दिसणार की नाही की त्यांची जागा दुसरा अभिनेता घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. तर 2024 मध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. कास्टिंगवर सध्या चर्चा सुरु असून कधी नावं समोर येणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.