नवी दिल्ली : दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचा यंदा 'सरकार ३' हा सिनेमा प्रदर्शित झाला.  मात्र 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर काही खास चालला नाही. यानंतर राम गोपाल वर्मा पुन्हा एक नवा प्रोजेक्ट सुरू करत आहे. आणि यामध्ये तब्बल २८ वर्षांनंतर एख सुपरस्टार जोडला जात आहे. आणि तो सुपरस्टार म्हणजे साऊथचा नागार्जुन आहे. २८ वर्षांपूर्वी रामूने नागार्जूनसोबत 'शिवा' हा सिनेमा केला होता. 


सांगण्यास आनंद होतो की, या सिनेमाने फक्त साऊथमध्येच नाही तर संपूर्ण देशावर जादू केली होती. या सिनेमाला प्रेक्षकांनी भरपूर पसंद केलं. या सिनेमाने नागार्जूनला एका रात्रीत स्टार केलं. त्यामुळे आता ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येत आहे. त्यामुळे नक्कीच काही तरी जादू होईल यात शंकाच नाही. याबाबत स्वतः नागार्जूनने ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्याने लिहिलं आहे की, २८ वर्षापूर्वी 'शिवा' या सिनेमाने माझं आयुष्य बदललं आहे आणि आता पुन्हा ते होणार आहे. 


या सिनेमात आणखी एक खास गोष्ट आहे. या सिनेमाचं प्रोडक्शन देखील त्याच स्टुडिओमध्ये होणार आहे जिथे शिवा सिनेमाचे प्रोडक्शन झाले होते. या स्टुडिओचं नाव आहे 'अन्नपूर्णा'. हा सिनेमा क्राईम थ्रिलर असल्याचं सांगण्यात येत आहे. या सिनेमांत नागार्जून ऑफिसरचं काम करणार असून सुपरस्टार नागार्जून या सिनेमाबद्दल फार उत्सुक आहे. लवकरच सिनेमाची ऑफिशिअल अनाऊंसमेंट केली जाईल.