मुंबई : सुपरस्टार रजनीकांत गेल्या तीन दिवसांपासून कावेरी रुग्णालयात दाखल होते. त्याच्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली. आता रविवारी रात्री उशिरा त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. ते स्वतः हॉस्पिटलमधून बाहेर पडताना दिसले आणि नंतर त्याच्या घराकडे निघाले. रजनीकांत यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर रजनीकांत यांनी सर्वप्रथम त्यांच्या चाहत्यांना संदेश दिला. त्या संदेशात रजनीकांत म्हणाले की, माझा उपचार संपला आहे. मला आता बरं वाटत आहे. ज्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली, ज्यांना माझी स्थिती जाणून घ्यायची इच्छा होती त्या सर्वांचे मी आभार मानतो.


तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. आता या मेसेजनंतर रजनीकांत यांनी स्वतःचा एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्या फोटोत ते त्यांच्या घराकडे पाहत आहे. त्या फोटोसोबत त्यांनी लिहिले – Homecoming.


रजनीकांत यांना रुग्णालयात नेण्यामागचं कारण...


रजनीकांत यांना तीन दिवसांपूर्वी चक्कर आली होती, त्यानंतर त्यांना कावेरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांनी कॅरोटीड आर्टरी रिव्हॅस्क्युलायझेशन (सीएआर) केले.


मेंदूपर्यंत रक्त पोहोचण्याची समस्या असताना ही प्रक्रिया केली जाते. त्यामुळे रजनीकांत यांना आणखी काही दिवस रुग्णालयात राहावे लागेल, असे बोलले जात होते. पण रविवारी रात्रीच डिस्चार्ज मिळाल्यावर त्यांनी त्याच्या सर्व चाहत्यांना आश्चर्यचकित केले. वर्क फ्रंटवर, रजनीकांतचा आगामी चित्रपट अनाठे 4 नोव्हेंबरला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची प्रचंड चर्चा असून ट्रेलरलाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे.