मुंबई : साउथ इंडियन सिनेमांच्या अव्वल स्थानी असलेली अभिनेत्री तमन्ना भाटियाने बॉलिवूडमध्ये सुद्धा अनेक हिट सिनेमात काम केले आहे. काही वर्षांआधी तमन्ना आणि भारतीय कर्णधार विराट कोहली एका जाहीरातीच्या माध्यामातून एकत्र झळकले होते. तेव्हा त्यांच्या नात्याच्या चर्चांना उधान आले होते. आता मात्र तब्बल सहा वर्षांनंतर तमन्नाने त्यांच्या नात्याचा खुलासा केला. 2012 साली तमन्ना-विराट एका मोबाइल जाहीरातीच्या माध्यामातून छोट्या पडद्यावर एकत्र आले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


 


एका कार्यक्रमत तमन्नाकडे त्या जाहिराती संबंधित विचारणा करण्यात आली. त्यावर ती म्हणाली, 'त्या जाहिरातीच्या शूटिंग नंतर आम्ही एकमेकांशी कधीही संवाद साधण्याचा प्रयत्न केला नाही. माझ्या मते जाहीराती मध्ये आम्ही फक्त चार शब्द बोललो विराट कोहली सोबत करणे खूपच कठीण होते. कारण बाकी अभिनेत्यांपेक्षा तो फार चांगला आहेत.' असे वक्तव्य तिने केले.


सध्या तमन्ना 'महालक्ष्मी' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. तिचा 'महालक्ष्मी' सिनेमा बॉलिवूड सिनेमा 'क्विन'चा रिमेक असणार  आहे. या व्यतिरिक्त ती 'देवी 2' आणि अन्य सिनेमात मुख्य भूमिका साकारताना दिसली. तमन्नाने वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी करिअरला सुरूवात केली. बॉलिवूड मध्ये तिने 'बाहुबली', 'बाहुबली 2', 'हिम्मतवाला', 'एंटरटेनमेंट, 'हमशक्ल्स' यांसारख्या सिनेमांमध्ये भूमिका साकारली पण बॉलिवूड मध्ये मात्र ती अपयशी ठरली.