नवी दिल्ली : अभिनेत्री श्रीदेवीचे पार्थिव आज रात्री १०-३० वाजता मुंबई विमानतळावर दुबई पोलिस घेऊन येणार असल्याची माहिती समोर आलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुबई आणि मुंबई पोलीसांमध्ये कागदोपत्री प्रक्रिया पुर्ण झाल्यावर दुबई पोलिस मुंबई विमानतळावरुनच दुबईला रवाना होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.


अदनानने घेतली भेट 


श्रीदेवीसोबत काम केलेला पाकिस्तानी अभिनेता अदनान सिद्दकीच वक्तव्य समोर आलयं. अदनान यावेळी दुबईत आहे.


तो कपूर परिवाराच्यांपैकी एक मानला जातो. श्रीदेवीच्या मृत्यूची बातमी समजताच त्याने बोनी कपूर यांची भेट घेतली.


इंडियन एक्सप्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलेयं. मी खूप नशिबवान आहे मला 'मॉम' सिनेमात त्यांच्यासोबत काम करायला मिळालं आणि याचं दु:खही आहे की त्या आता या जगात नाहीत. 
 
श्रीदेवींच्या मृत्यूप्रकरणी कळाले तेव्हा मी कुठेतरी जायच्या तयारीत होतो. बोनी कपूर साहेबांनी मी फोन केला. त्यांनीही तात्काळ तो रिसिव्हही केला. 


परवानगी नव्हती पण...  


त्यानंतर मी एमेरेट्स टॉवर हॉटेलमध्ये गेलो. त्यावेळी वर जाण्याची परवानगी नव्हती. पण त्यांनी मला बोलावून घेतलं. मी बोनी कपूर यांना भेटलो तेव्हा ते लहान मुलांप्रमाणे रडत होते. माझ्याने ते बघितल जातं नव्हतं.


काही वेळापूर्वी इतक एन्जॉय करणारी आता हयात नाही यावर विश्वास बसत नव्हता. 


असा आहे घटनाक्रम


त्यानंतर अभिनेत्री श्रीदेवीचे पार्थिव भाग्य बंगला येथे नेण्यात येणार आहे.


 कपूर कुटुंबियांना पार्थिव दर्शनाकरता ठेवण्यात येईल.


 श्रीदेवीचे पार्थिव पवन हंस विमानतळाजवळील स्माशान भुमित अंतिम दर्शनासाठी रात्री १ वाजता ठेवले जाणार आहे. 


 सकाळ पर्यंत अंतिम दर्शन सुरु राहणार आहे. 


 सकाळी ९ च्या दरम्यान शासकीय इतमामात अभिनेत्री श्रीदेवीच्या पार्थिवाला अग्नी देऊन अंतिम संस्काराची प्रक्रिया पुर्ण केली जाणार आहे.