मुंबई :  ड्रग्ज केस प्रकरणी मागील 25 दिवसांपासून कोठडीत असणाऱ्या आर्यन खान याला अखेर उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. आर्यनसह मूनमून धमेचा आणि अरबाज मर्चंट या दोघांचा जामीनही मंजूर करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलग तीन दिवसांपासून या प्रकरणावर सुनावणी सुरु होती. यादरम्यान विविध मुद्द्यांना अनुसरून युक्तिवाद मांडण्यात आला. ज्यानंतर गुरुवारी उच्च न्यायालयानं दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकल्यानंतर जामीन मंजूर केला. 


आर्यनचा जामीन मंजूर झाल्यानंतर मन्नतवर देखील फटाकेबाजी करण्यात आली. आर्यनच्या फॅन्सने जामीनानंतर जंगी सेलिब्रेशन केलं. तर इकडी उद्या किंवा परवा आर्यन जेलमधून बाहेर येणार आहे आणि घरी परतणार नाही. 



या दरम्यान आता कोर्टाच्या सुनावणीनंतर आर्यनची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आर्थर रोड कारागृह प्रशासनाकडून सायंकाळी 6 वाजता आर्यन खानला जेवण देत असताना त्याला जामीन मिळाल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळाल्यानंतर आर्यनला आनंद झाला आणि त्याने तुरुंगातील कर्मचाऱ्यांचे आभार मानले. सगळ्यांना थँक्यू म्हणत त्यांने आनंद व्यक्त केली. 


आर्यन घरी परतणार असणार असल्याने आता मन्नतवर देखील आनंदाचं वातावरण आहे.