Miss universe 2021 : देशासाठी अभिमानाचा क्षण आहे. भारताची हरनाझ कौर संधूच्या डोक्यावर Miss Universe 2021 चा ताज ठेवण्यात आला. भारताने तब्बल 21 वर्षांनंतर मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला आहे. यापूर्वी 2000 मध्ये लारा दत्ता मिस युनिव्हर्स बनली होती. संपूर्ण भारतीयांसाठी हा गर्वाचा क्षण आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरनाझ संधूने भारताचं नाव उंचावल्यानंतर पहिली प्रतिक्रिया शेअर केली आहे. "हा माझा एकटीचा प्रवास कधीच नव्हता, तो आपला प्रवास होता. मी लहान पावलांनी सुरुवात केली आणि जसजसे मी शेवटाच्या जवळ आले, तसतसे मी माझ्या सर्व पॅनेलच्या सदस्यांना माझ्या प्रवासाचा एक अविभाज्य भाग बनवल्याबद्दल धन्यवाद देऊ इच्छिते. मी माझ्या डिझाइनर्सचे आभार मानते. त्यांच्यामुळे मी स्टेजवर चमकले. आज तुम्ही स्टेजवर पाहत असलेल्या मुलीमध्ये मला सामील केल्याबद्दल धन्यवाद."



सोबतच तिने स्टेजवर देखील विजयाचं श्रेय आपल्या जवळच्या व्यक्तींना दिलं आहे.



हरनाझ संधू कोण आहे?


हरनाझ संधू चंदीगडची राहणारी असून ती मॉडेल आणि अभिनेत्री देखील आहे. हरनाझने पंजाबी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. हरनाझ ‘यारा दियां पू बारां’ आणि ‘बाई जी कुट्टांगे’ या पंजाबी सिनेमांमध्ये झळकली आहे.


तिने अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेत विजय मिळवला आहे. त्याशिवाय ती अभ्यासातही हुशार आहे. तिचे पदवी शिक्षण पूर्ण झाले असून सध्या ती सध्या पदव्यूतर शिक्षण पूर्ण करत आहे. तिला घोडेस्वारी आणि पोहण्याची आवड आहे.