मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu)  आणि पती करण सिंग ग्रोव्हर (Karan Singh Grover)  लवकर आई-वडील होणार आहेत. अलीकडेच बिपाशानं तिच्या बेबी बंपचे (Bipasha Basu Pregnancy) काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. बिपाशा आणि करण यांचे सहा वर्षांपूर्वी लग्न झाले. दोघेही सोशल मीडियावर रोमॅन्टिक फोटो शेअर करताना दिसता. आता ते आई- वडील होणार आहेत या बातमीनं लोक आनंदी आहेत. दरम्यान, अचानक करण सोशल मीडियावर ट्रोलिंगचा शिकार झाला आहे. 


आणखी वाचा : आमिर प्रमाणे आमचा चित्रपट पण बॉयकॉट करा; अनुराग कश्यप आणि तापसी पन्नूनं केली विचित्र मागणी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिपाशानं लवकरच आई होणार असल्याची बातमी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली. बिपाशा आणि करण सिंग आई-वडील होण्यासाठी खूप उत्सुक आहेत. मात्र, याचदरम्यान करण सोशल मीडियावर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. करणचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 



आणखी वाचा : बिग बींच्या एका चुकीमुळे Ranbir-Alia चं करिअर धोक्यात? जाणून घ्या प्रकरण


या व्हिडिओमध्ये करण फूड मॉलमधून त्याची गर्भवती पत्नी बिपाशासाठी काही सामान घेऊन जाताना दिसतो. तो बाहेर येताच पापाराझी करणच्या अवती-भोवती गर्दी करतात. यावेळी एक गरीब मुलगी त्यांच्याकडे भीक मागते पण करण तिच्याकडे दुर्लक्ष करतो आणि पुढे निघून जातो. नेटकऱ्यांना करणचा हा स्वभाव आवडला नाही आणि त्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्या गरीब मुलीला काही दिले असते अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.


आणखी वाचा : सलमान खानला Aids ची बाधा आणि परदेशात मुलगी? अभिनेत्याबाबत मोठं रहस्य समोर


बिपाशानं आपल्या प्रेग्नेंसीची बातमी चाहत्यांसोबत शेअर करत लिहिले की, 'एक नवीन वेळ, एक नवीन टप्पा, एक नवीन प्रकाश आमच्या आयुष्यात जोडणार आहे.' बिपाशाची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली आणि लोकांनी लवकरच आई होणाऱ्या अभिनेत्रीला शुभेच्छा दिल्या.