घटस्फोटानंतर प्रियांकाचा दीर घेतोय मुलींची काळजी तर जाऊ पार्टीत मग्न, VIDEO समोर
Joe Jonas and Sophie Turner : जो जोनस आणि सोफी टर्नर यांनी नुकतीच घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर आता त्या दोघांचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. दरम्यान, सोफीचा व्हिडीओ पाहून अनेकांना मोठा धक्का बसला आहे.
Joe Jonas and Sophie Turner : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या दीर जो जोनस आणि जाऊ सोफी टर्नर या दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर त्यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु होत असताना त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अखेर त्यावर वक्तव्य केलं. त्यांनी खुलासा केला की लग्नाच्या चार सुखी संसारानंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर आता जो जोनस हा त्याच्या मुलींसोबत ब्रेकफास्ट करताना दिसला. त्यावेळी त्याच्या हातात लग्नाची अंगठी देखील नव्हती. तर सोफी विषयी बोलायचे झाले तर ती पार्टी करताना दिसली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर जो जोनस त्याच्या दोन्ही मुलींसोबत दिसत आहे. जो आणि सोफीची एक मुलगी ही तीन वर्षांची आहे आणि दुसरी ही एक वर्षाची आहे. रिपोर्ट्सनुसार, अशी माहिती समोर आली आहे की जो जोनसनं मुलींच्या जॉइंट कस्टडीची मागणी केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या दोन्ही मुली त्याच्यासोबत आहे. इतकंच नाही तर तो त्या दोघींना जोनस ब्रदर्सच्या टूरवर देखील घेऊन गेला होता.
सोफी टर्नच्या व्हिडीओ विषयी बोलायचे झाले तर तिचे क्लबमधील अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. क्लबमध्ये पार्टी करत असल्याचे व्हिडीओ पाहिल्यानंतर असे अनेकांचे मत आहे की त्यांच्या नात्यात खूप आधीच दुरावा आला होता. असं म्हटले जात आहे की ITV या कार्यक्रमाच्या संपूर्ण टीमसोबत सोफीनं खूप डान्स केला. बार मॅनेजरनं सांगितलं की सोफी कम्फर्टेबल होती. तिला पाहून असं वाटतं होतं ती नॉर्मल आहे. तिनं टीमच्या लोकांसोबत आणि मित्र-मैत्रिणींसोबत खूप वेळ व्यथित केला.
हेही वाचा : घटस्फोटानंतर अर्जुन कपूरबरोबर रिलेशनमध्ये? कुशा कपिला स्पष्टच बोलली, 'मला खूप...'
जो जोनस आणि सोफी टर्नर हे 2016 मध्ये रिलेशनशिपमध्ये आले तर 2019 मध्ये ते लग्न बंधनात अडकले. फ्रान्समध्ये त्या दोघांच्या लग्नाचा आलिशान सोहळा होता. त्या दोघांच्या लग्नाला चार वर्षे झाली आहेत. त्यांना दोन मुलं आहेत. पण त्यांच्या नात्यात दुरावा आला आहे. त्यांच्यात दुरावा आल्याची कारण काही समोर आलेली नसली तरी विविध चर्चा मात्र, सुरुच आहेत. त्यापैकी एक म्हणजे जो जोनसला घरात राहायला आवडतं तर सोफीला पार्टी करायला खूप आवडायचं. त्यामुळे त्यांच्याच दुरावा निर्माण झाला. जो जोनसनं हे लग्न वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण अखेर त्यांचं लग्न हे मोडलं.