मुंबई :  नात्यात दुरावा आला की पुन्हा ते नातं सुरळीत करणं खूप अवघड असतं असं म्हणतात. धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांतसोबतही असंच काहीसं घडताना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोघांनी लग्नाच्या 18 वर्षानंतर एकमेकांपासून वेगळे झाल्याची घोषणा करून सर्वांना धक्काच दिला. आता ऐश्वर्याने तिच्या सोशल मीडिया हँडलवरून धनुषचे नाव काढून ते पुन्हा कधीच एकत्र येऊ शकत नाहीत असे संकेत दिले आहेत.


ऐश्वर्याला यापुढे धनुषचे नाव कोणत्याही प्रकारे तिच्या नावाशी जोडायचे नाही. तिने आपल्या नावापुढील धनुषचे नाव इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडलवरून काढून टाकले आहे. ऐश्वर्याचे ट्विटर हँडल आधी @ash_r_dhanush होते, पण आता तिने @ash_rajinikanth असे ठेवले आहे.




ट्विटरसोबतच तिने इन्स्टाग्रामवरही आपले नाव बदलले आहे. पूर्वी तिचे इंस्टाग्राम हँडल @aishwaryaa_r_dhanush असे होते, आता ते बदलून @aishwaryarajini करण्यात आले आहे. तिने यासोबतच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील बायोमध्ये बदल केला आहे. तिने लिहिलं आहे की, " I am what I am."