Ranveer Singh on his Wedding Ring : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लग्नाचे फोटो डिलीट केले आहेत. रणवीरनं असं केल्यानं त्याच्या चाहत्यांना देखील आश्चर्य झाले आहे. त्याचं कारण म्हणजे ते दोघं लवकरच आई-वडील होणार आहेत. अशात त्या दोघांच्या वैवाहिक आयुष्यात काही अडचणी आल्या नाही ना, असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. दरम्यान, या सगळ्या चर्चांमध्ये रणवीरनं एका कार्यक्रमात हजेरी लावली होती आणि तिथे त्यानं असं काही सांगितलं की या सगळ्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील टीफनी या ज्वेलरी ब्रॅंडच्या कार्यक्रमात रणबीरनं हजेरी लावली होती. त्यावेळी त्याला विचारण्यात आलं की असा कोणता दागिना आहे जो त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे किंवा हृदयाच्या जवळ आहे. त्यावर उत्तर देत रणवीरनं त्याच्या "लग्नाची अंगढी, जी दीपिका पदुकोणनं त्याला घातली होती, त्याला ती अंगढी खूप आवडते असं सांगितलं. त्याशिवाय प्लॅटिनम रिंग आहे जी त्यांच्या साखरपुड्याची आहे. रणवीरनं हे देखील सांगितलं की त्याच्या आईचे डायमंडचे कानातले आणि आजीचे मोतीचे कानातले त्याला खूप आवडतात." तर रणवीरनं यावेळी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. तर त्याच्या हाय हील्सनं सगळ्याचे लक्ष वेधले. रणवीरनं सांगितलेल्या या गोष्टीनं सगळ्यांना आनंद झाला आहे, कारण यावरुन त्या दोघांच्या वैवाहिक आयुष्यात काही अडचणी नाही असं दिसतंय. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


रणवीर आणि दीपिका हे दोघे नुकतेच सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेले होते. या दरम्यान दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यात दीपिकाचं बेबी बंप देखील दिसत होतं. असं म्हटलं जात आहे की ते दोघे बेबीमूनचा आनंद घेण्यासाठी सुट्टीवर गेले होते. रणवीर आणि दीपिकानं 2018 मध्ये लग्न केलं. तर यंदाच्यावर्षी सप्टेंबरमध्ये म्हणजे 2024 मध्ये आई-वडील झाले. त्या दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रेग्नंसीची घोषणा केली होती. 


हेही वाचा : बाबो! एकाच चित्रपटात दिसणार सनी लिओनी, गौतमी पाटील आणि सपना चौधरी...


त्या दोघांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर रणवीर आणि दीपिका आता सिंघम अगेनमध्ये दिसणार आहेत. या चित्रपटात रणवीरसोबत दीपिका देखील पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या दोघांशिवाय अजय देवगण, अक्षय कुमार, करीना कपूर खान, टायगर श्रॉफ आणि अर्जुन कपूर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी करणार आहे. या चित्रपटाशिवाय दीपिका कल्कि 2898 एडीमध्ये दिसणार आहे. यात तिच्यासोबत प्रभास आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.