मुंबई : 'गदर 2'च्या भरघोस कमाईने सनी देओलकडे सिनेमांची रांगच रांग लागली आहे. या चित्रपटाच्या जबरदस्त यशाने सनी देओलच्या कारकिर्दीला इतकं चालना दिली आहे की, प्रत्येकजण त्याला आपल्या चित्रपटात साईन करू इच्छितो. एवढंच नव्हेतर सनी देओलची काही चित्रपटांमध्ये एन्ट्रीही निश्चित झाली आहे तर काही चित्रपटांमध्ये त्याला कास्ट करण्याची चर्चा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'गदर 3'
'गदर 2'च्या बंपर यशानंतर 'गदर 3'च्या बातमीने जोर धरला आहे. अनिल शर्मा यांनीही अनेक मुलाखतींमध्ये याबाबतचे संकेत दिले आहेत. या सिनेमाचा तिसरा भाग बनवायला फारसा विलंब होणार नाही हे स्पष्ट आहे.


लाहौर 1947 
आमिर खानने नुकतीच 'लाहोर 1947'ची घोषणा केली आहे. या चित्रपटात सनी देओल मुख्य भूमिकेत असणार असून आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती होणार आहे, तर हा सिनेमा राजकुमार संतोषी दिग्दर्शित करणार आहेत.


बॉर्डर 2
काही काळापूर्वी सनी देओलने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, 2015 पासून 'बॉर्डर 2' बनवण्याचं प्लॅनिंग सुरू होतं. वृत्तांवर विश्वास ठेवायचा झाला तर सनी देओलशिवाय आयुष्मान खुराना या चित्रपटात असू शकतो. पण अजून कास्टिंग फायनल झालेली नाही.


सन ऑफ सरदार 2
पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, अजय देवगणच्या 'सन ऑफ सरदार' चित्रपटात सनी देओलला घेण्याची चर्चा आहे. स्क्रिप्टवर कामही सुरू झालं आहे, मात्र अधिकृतपणे या बातमीला काहीही दुजोरा मिळालेला नाही.


'बाप' आणि 'सूर्या'
गेल्या वर्षी 'बाप' चित्रपटाची घोषणा झाली होती. यात सनी व्यतिरिक्त जॅकी, मिथुन चक्रवर्ती आणि संजय दत्त देखील असतील. याशिवाय मल्याळम चित्रपट 'सूर्या'च्या हिंदी रिमेकमध्ये सनी देओल हिरोच्या भूमिकेत दिसणार आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, चित्रपटाचा काही भाग गेल्या वर्षी जयपूरमध्ये शूट करण्यात आला आहे..


'अपने 2' आणि 'जन्मभूमि'
याशिवाय देओल कुटुंबीय बऱ्याच दिवसांपासून 'अपने 2' आणण्याचा विचार करत आहेत. सनीने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे की, त्याच्याकडे या सिनेमाची कथा आहे पण शूटिंग कधी सुरू होईल हे पाहणं बाकी आहे. या चित्रपटाशिवाय सनी देओलकडे 'जन्मभूमी' हा चित्रपट आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाला तर अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीचे कोर्टरूम ड्रामा त्यात घडेल. सनीसोबत संजय दत्तही असणार आहे.