हानीमूनला गेल्यानंतर अनुष्काचा नवा व्हिडिओ व्हायरल
हा एक वॉशरूम व्हिडिओ असून त्यात अनुष्का वेड्यासारखी डान्स करत आहे.
मुंबई : इटलीमध्ये गुपचूप लग्न केल्यानंतरही विराट-अनुष्काच्या लग्नाची चर्चा व्हायची तेवढी झालीच.
या दोघांच्या लग्नातील फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. विराट अनुष्का हानीमुनसाठी रोम मध्ये पोहोचले आहेत.
हानीमूनला गेल्यानंतर अनुष्काने पहिल्यांदाच स्वत:च्या अधिकृत अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे.
व्हिडिओ व्हायरल
अनुष्काच्या लग्नानंतर एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
हा एक वॉशरूम व्हिडिओ असून त्यात अनुष्का वेड्यासारखी डान्स करत आहे.
पण या व्हिडिओ विराट कुठेच दिसत नाहीए. हे प्रकरण समजून घेऊया...
काजारिया ची ब्राण्ड अम्बॅसिटर
Kajaria's Kerovit ची ही जाहिरात आहे. अनुष्का काजारिया ची ब्राण्ड अम्बॅसिटर आहे.
या जाहिरातीत अनुष्का काजरियाचे प्रोडक्ट पाहून वेडी होत डान्स करत आहे. अनुष्का फॅन क्लबने हा व्हिडिओ आपल्या ट्विटर हॅंडलवरून ट्विट केला आहे.
मुंबई, दिल्लीत रिसेप्शन
अनुष्का आणि विराटने ११ डिसेंबरला इटलीत जाऊन लग्न केले. दिल्लीतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये याचे रिसेप्शन होणार आहे.
आणखी एक रिसेप्शन मुंबईतही होणार असल्याचेही वृत्त आहे. सिने क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती इथे उपस्थित राहणार आहेत.