कंगना राणावतच्या मुलाखतीनंतर हृतिक ट्विटरवर ट्रोल
नुकतीच कंगना राणावत हिने एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीनंतर ती खूप चर्चेत आली आहे. या मुलाखतीत कंगनाने चित्रपट सृष्टीतील अनेक गुपीत उघड केले.
नवी दिल्ली : नुकतीच कंगना राणावत हिने एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीनंतर ती खूप चर्चेत आली आहे. या मुलाखतीत कंगनाने चित्रपट सृष्टीतील अनेक गुपीत उघड केले.
या मुलाखतीत कंगनाने हृतिक रोशन, आदित्य पांचोली, राकेश रोशन, करण जोहरसंदर्भात अनेक गोष्टी सांगितल्या.
कंगनाने या मुलाखतीत हृतिकशी असलेल्या संबंधांबद्दल अनेक खुलासे केले. या मुलाखतीनंतर हृतिकची माजी पत्नी सुजान खान हिने ट्विट करून आपल्या माजी पतीचा बचाव केला.
या संदर्भात त्याने कोणतेही ट्विट किंवा वक्तव्य केले नाही. पण तरीही तो एका ट्विटवरून ट्रोल झाला. त्याने रांची डायरीज चित्रपटाचे एक गाण्याची लिंक शेअर केली. त्यानंतर तो सोशल मीडियावर ट्रोल झाला. या गाण्याचे नाव फॅशन क्वीन आहे.
हृतिकच्या या ट्विटवर लोकांनी कमेंट करताना म्हटले की, तुम्ही माझ्या नजरेतून उतरला आहात. कंगनाची मुलाखत पाहिल्यावर तुमच्या विषयी वाटणारा आदर संपला आहे. तसेच सुजान खानने केलेल्या ट्विटवरही हृतिकवर टीका केली आहे.
पाहा ट्विट