मुंबई : भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांचं कुटुंब आणि चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पण लता मंगेशकर यांच्या गाण्याची जादू ही अजरामर राहणार आहे. लता मंगेशकर यांचा अंत्यविधी मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये पार पडला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी भारताचे पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पोहोचले होते. त्यांनी शेवटचं लता दीदींचं दर्शन घेतलं.इतर राजकीय नेते आणि सेलिब्रिटी लता दीदींना अखेरचं पाहण्यासाठी, त्यांना आदरांजली वाहण्यासाठी पोहोचले होते. 


लता मंगेशकर यांच्या निधनानंतर आता त्यांची बहिण आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. नुकताच त्यांनी एक जुना फोटो शेअर केला आहे.


आशा भोसले यांनी त्यांच्या नातीसोबतचा अनेक वर्षांपूर्वीचा फोटो शेअर केला आहे. आशा भोसले आणि जनाई यांचा फोटो हा खूप जुना आहे. जनाई आता मोठी झाली आहे. तिने देखील गायन क्षेत्रात पदार्पण केलं आहे. 



आशाताई अनेकदा जनाईसोबतचे फोटो आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. जनाई आणि आशा भोसले यांचं नातं सगळ्यांनाच ठावूक आहे. ती जणू आशा भोसले यांचा आधार बनली आहे. जनाईला ही आजी आशा यांच्यासोबत वेळ घालवायला आवडत असल्याचं दिसून येतं.