आजही Sunny Leone कोणाच्या कॉलची पाहतेय वाट, भावुक होतं केला खुलासा
तू मला कॉल करत नाहीस...
मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो' आपल्या चाहत्यांना प्रत्येक नवीन एपिसोडमध्ये खळखळून हसण्याची संधी देतो. या आठवड्यातही काही पाहुणे शोमध्ये येणार आहेत, जे चाहत्यांचे भरपूर मनोरंजन करणार आहेत. यामध्ये सनी लिओनी, गायक मिका सिंग, तोशी साबरी आणि शरीब साबरी हे कलाकार दिसणार आहेत.
यादरम्यान कपिल आपल्या विनोदाने सर्वांना हसवताना दिसणार आहे, पण यादरम्यान सनी लिओनी कपिलला आपल्या तक्रारी सांगताना दिसणार आहे.
नेहमीप्रमाणे त्याच्या स्वभावानुसार, कपिल शर्मा सनीला मजेदार पद्धतीने फ्लर्ट करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला म्हणतो, 'तुमच्यासोबत खूप दिवसांनी भेट होत आहे'
त्यानंतर कपिलचं सहज बोलणं पाहून सनीही जागीच थक्क होते आणि म्हणते, 'मला माहीत आहे तू मला कॉल करत नाहीस, हॅलो ही बोलू नकोस.. काही नाही'. सनीची तक्रार ऐकून कपिल दोन पावले पुढे जातो आणि म्हणतो, 'तुमच्या नंबरची वाट बघून मी लग्न केले आहे'.