VIDEO : मॅक्सवेलनंतर आता ट्रॅव्हिस हेडही झाला भारताचा जावई? या भारतीय मॉडेलने बांधली लग्नगाठ
Bengali Model Wedding With Travis Head : भारतीय मॉडेलनं केलं ऑस्ट्रेलियाचा दमदार फलंदाज ट्रेव्हिस हेडशी लग्न! व्हिडीओची एकच चर्चा
Bengali Model Fantasy Wedding With Travis Head : वर्ल्ड कपच्या अंतीम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा पराव करत विश्वचषक त्यांच्या नावावर केला. यंदाच्या वर्ल्डकपची भारतीयांना खूप अपेक्षा होती की यंदाचा वर्ल्ड कप हे आपल्यालाच मिळणार. पण असं होऊ शकलं नाही. या सामन्यात सगळ्यांचं लक्ष हे सलामीवीर ट्रॅव्हिस हेडनं वेधलं कारण त्यानं या सामन्यात शतक केलं. त्यानंतर सगळे ट्रॅव्हिस हेडनंची स्तुती करत होते. या सगळ्यात असं काही झालं आहे जे पाहून सगळ्यांना आश्चर्य झालं. बंगाली मॉडेल हेमोश्री भद्रानं ट्रॅविस हेडशी लग्न केलं आहे. त्याचा व्हिडीओ तिनं सोशल मीडियावर शेअर केला असून तो चर्चेचा विषय ठरला आहे.
हेमोश्री भद्रानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत हेमोश्रीनं ट्रॅव्हिस हेडच्या नावाचं कुंक कपाळी लावलं आहे. या व्हिडीओत हेमोश्री तिच्या कुटुंबातील काही लोकांसोबत दिसत आहे. या व्हिडीओत हेमोश्री म्हणाली की 'मी हेडच्या नावाचं कुंकू कपाळी लावलं आहे. त्याच्या मी जितका विचार करते तितकी माझ्या चेहऱ्यावरील लाली वाढते. माझ्या सुंदर हातात त्याचा फोटो घेतला आहे. हे माझी पती झाले तर..?' असं हेमोश्री म्हणते आणि त्यानंतर बंगाली लग्न सोहळ्यात वाजणारं पारंपारिक संगीत तिच्या मागे असलेल्या महिला तो आवज काढतात. हा व्हिडीओ शेअर करत हेमोश्रीनं कॅप्शन दिलं की 'हे माझे पती झाले तर..? मला तुझ्याशी लग्न करायचंय. तुझ्या कौशल्यानं आणि प्रतिभेनं माझं मन जिंकलं. ट्रॅव्हिस हेड आय लव्ह यू...'
हेही वाचा : चित्रपटात महत्त्वाची भूमिका तरी ट्रेलर लॉन्चला का नव्हते अनिल कपूर? रणबीर कपूरचा खुलासा
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर कमेंट करत त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की 'संपूर्ण कुटुंब पागल झालंय.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'संपूर्ण खानदान पागल झालं आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला की 'आदिवासी लोक तुम्ही जंगलातून कधी आलात.' तर काही नेटकऱ्यांनी हसत हे काय असं म्हटलं आहे. दरम्यान, हे इथेच थांबलं नाही तर या व्हायरल व्हिडीओमुळे अनेकांनी तिच्यावर अश्लील कमेंट केल्या तर कोणी जीवे मारण्याची धमकी दिली. तर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यावरून आता हेमोश्रीनं देखील नाराजी व्यक्त करत म्हटलं की 'मी व्हिडीओ पोस्ट करताच अनेक जण अश्लील कमेंट्स करू लागले. मला कोणी जीवे मारण्याची धमकी देऊ लागले. त्यासगळ्याला मी त्रासले आहे. मी त्या ऑस्ट्रेलियन खेळाडूशी करणं खऱ्या आयुष्यात शक्य नाही. व्हिडीओ केवळ मज्जा म्हणून शूट करण्यात आला आहे.