Aryan Khan च्या अटकेनंतर सलमान शाहरुखच्या भेटीला
ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानच्या अटकेनंतर अभिनेता सलमान खान रात्री उशिरा शाहरुख खानच्या घरी पोहोचला.
मुंबई : ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानच्या अटकेनंतर अभिनेता सलमान खान रात्री उशिरा शाहरुख खानच्या घरी पोहोचला. विशेष म्हणजे न्यायालयाने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह तीन आरोपींना एक दिवसाच्या एनसीबी कोठडीत पाठवले.
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आणि सलमान खान हे एकमेकांचे चांगले मित्र मानले जातात. अशा कठीण काळात सलमान त्याच्या मित्राला भेटण्यासाठी त्याच्या घरी पोहोचला.
शाहरुख खानच्या बंगल्याबाहेर सलमान खानला त्याच्या कारमध्ये फोटोग्राफर्सच्या कॅमेऱ्यांनी पकडले. या दरम्यान, लोकांची प्रचंड गर्दी तेथे दिसली. सलमान स्वत: लोकांना आणि माध्यमांना कारच्या समोरुन दूर जाण्याचे संकेत देताना दिसला.
विशेष म्हणजे, NCB ने आर्यन खानसह 7 जणांना शनिवारी रात्री क्रूझवर ड्रग्ज पार्टी दरम्यान ताब्यात घेतले. सुमारे 16 तासांच्या चौकशीनंतर आणि त्याला अटक करण्यात आली.
आर्यन खान व्यतिरिक्त, एनसीबीने या प्रकरणात इतर सर्व लोकांना अटक केली आहे.
तथापि, एजन्सीने आज फक्त तीन लोकांना न्यायालयात हजर केले, ज्यात आर्यन खान, अरबाज सेठ मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचा समावेश आहे. NCB उद्या इतरांना न्यायालयात हजर करेल.
एनसीबीने रविवारी दावा केला की, बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि अटक केलेल्या तीन आरोपींमधील संबंध दाखवण्याचे पुरावे त्यांच्याकडे आहेत.