मुंबई : नेहा धूपिया आणि अंगद बेदीने एक महिन्यापूर्वी लग्न केलं. नेहा धूपियाचं लग्न हे सगळ्यांसाठीच मोठं सरप्राईज होतं. कुणालाही लग्नाची माहिती न देता नेहाने दिल्लीच्या एका गुरूद्वारात लग्न केलं आहे. सगळ्या विधी अगदी साध्या पद्धतीने करून तिने आपला आणि अंगदचा फोटो शेअर केला होता.  लग्नाचे फोटो शेअर करून तिने चाहत्यांना ही बातमी दिली होती.


लग्नाचा मोठा खुलासा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र आता एका महिन्यानंतर नेहाने आपल्या लग्नाबाबत मोठा खुलासा केला आहे. लग्नाबाबत बोलताना नेहा धूपियाने एका मुलाखतीत म्हटलं आहे की, तिच्या लग्नाबद्दल सगळ्यात अगोदर करण जोहरला माहित होतं. तिने सांगितले की, एकदिवस मी करण जोहरच्या घरी त्याच्या सोफ्यावर बसले होते आणि बोलता बोलता मी त्याला माझ्या लग्नाबद्दल सांगितले. मी आता लग्नासाठी तयार आहे, असे मी करणला म्हणाले. यावर मस्त... मीच ही बातमी पोस्ट करणार, असे तो मला म्हणाला.


अंगदबद्दल काय बोलली नेहा? 


त्यानंतर अंगद बेदीबद्दल बोलताना नेहा म्हणाली की, 4 वर्षांपूर्वी अंगदने मला लग्नाबद्दल विचारलं होतं. मात्र तेव्हा मी दुसऱ्या रिलेशनशिपमध्ये होती तर मी नाही म्हटलं होतं. त्यावेळी अंगदच प्रेम हे एकतर्फी होतं. 4 वर्षानंतर माझं ब्रेकअप झालं तेव्हा त्याचं म्हणणं होतं की, मी माझ्या आयुष्यातील 4 वर्ष वाया घालवली आहेत. त्यानंतर अंगदने माझ्याशी नाही तर अगदी परस्पर माझ्या कुटुंबाशी लग्नाबद्दल बोलला. अंगदची आई लग्नाअगोदर मला एकदा भेटू इच्छित होती. त्यांच असं म्हणणं होतं की, मला माहित आहे ना की मी काय करायला जात आहे. 


कुणालाही कोना कोन माहिती न मिळता अंगद आणि नेहाने लग्न केलं. नेहाने 10 मे 2018 रोजी आनंद कारज पद्धतीने हे लग्न केलं. असं देखील म्हटलं जातं की नेहा गरोदर असल्यामुळे हे लग्न करण्यात आलं. मात्र अद्याप खरं काय खोटं काय हे कळलेलं नाही.