प्रेग्नेंसीच्या चर्चेनंतर नेहा कक्करचा शुटींगला नकार?
`इंडियन आयडल 12` ची संपुर्ण टीम कोरोनाच्या निर्बंध पाळत शुटींग करण्यासाठी दमनमध्ये गेली होती.
मुंबई : 'इंडियन आयडल 12' या सिंगिंग शोने प्रेक्षकांना जणू वेडच लावलं आहे.या शोमधील स्पर्धकांच्या एकापेक्षा एक अशा दमदार परफॉर्मन्सला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. तर दुसरीकडे नेहा कक्कर शोमध्ये परत येण्याचीही वाट फॅन्स पाहत आहेत.
नेहा कक्कर बर्याच दिवसांपासून 'इंडियन आयडल 12' च्या मंचावर दिसलेली नाही. ती या शोपासून सध्या दूर आहे. नेहाच्या जागी तिची बहीण सोनू कक्कर परिक्षकाच्या भूमिकेत दिसते आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत आता नेहा शोच्या फिनालेमध्ये दिसणार आहे की नाही यावर चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
नेहाचा शुटींगसाठी नकार , प्रेग्नेंसीच्या चर्चांना उधाण
'इंडियन आयडल 12' ची संपुर्ण टीम कोरोनाच्या निर्बंध पाळत शुटींग करण्यासाठी दमनमध्ये गेली होती. यावेळी नेहाने दमनला जाण्यास नकार दिला होता.त्यामुळे नेहा काही दिवसांपासून शोमध्ये दिसत नसल्याने एकच चर्चा सुरु झाली होती. तर दुसरीकडे नेहा कक्कर लवकरच गुड न्यूज देणार असल्याचं ही बोलंल जात होतं.
नेहाची इंडियन आयडलच्या मंचावर वापसी नाही?
इंडियन आयडलच्या अनेक सीजनमध्ये नेहा कक्कर परिक्षकांच्या भूमिकेत दिसली आहे. पण आता ती या मंचावर दिसणार नसल्याचं बोलंल जातयं. त्याच कारण म्हणजे नेहाला आता ब्रेक हवा आहे. स्वत: ला वेळ देण्यासाठी नेहाने हा निर्णय घेतला आहे. काम थोडसं बाजूला ठेवून नेहाला आता पती रोहनप्रीत सिंगसोबत वेळ घालवायचा आहे.