मुंबई : पॉर्नोग्राफी प्रकरणाची झळ ही आता राज कुंद्रानंतर पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला देखील लागण्याची चिन्ह दिसतायत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई क्राईम ब्रांच लवकरच शिल्पा शेट्टीच्या बँक अकाऊंट्सची तपासणी करणार आहे. पोलिसांना संशय आहे की, अ‍ॅप्स सबस्क्रिप्शनच्या माध्यमातून कमवलेले पैसे शिल्पाच्या अकाऊंटमध्ये ठेवण्यात आले आहेत. 


शिल्पा शेट्टीचं स्टेटमेंट केलं रेकॉर्ड


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पॉर्न फिल्म बनवल्याप्रकरणी अटक झालेल्या राज कुंद्रानंतर जुहूच्या शिल्पा शेट्टी हिच्या घरी छापा घालण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेची टीम काल दाखल झाली होती. यावेळी मुंबई का्राईम ब्रांचने शिल्पा शेट्टी हिचं देखील स्टेटमेंट नोंदवलं असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. डिसेंबर 2020 मध्ये शिल्पा शेट्टी व्हीआयएएएन इंडस्ट्रीजमधून का बाहेर पडली हे गुन्हे शाखेला जाणून घ्यायचं आहे.


राज कुंद्राचं HotShot कनेक्शन


तपासणीमध्ये असं समोर आलंय की, राज कुंद्रा पॉर्नोग्राफी फिल्म्स शूट केल्यानंतर डिजिटल प्लेटफॉर्म HotShotsला लाखो रूपयांमध्ये विकायचा. हे काम करण्यासाठी, कुंद्रा आणि त्याच्या टीमने एक विशेष पद्धत तयार केली होती. जी दररोज नवीन व्हॉट्सअॅप ग्रुप्सद्वारे अंमलात आणली जात होती. 


पोलिसांना ऑनलाईन बेटींगचाही संशय


ऑनलाइन बेटींगसाठी राज कुंद्राने पोर्नोग्राफीचा पैसा वापरल्याचा संशय मुंबई क्राईम ब्रांचला आहे. याबाबतचा संशय क्राईम ब्रांचने कोर्टाला देखील सांगितला आहे. 


19 जुलै रोजी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने राज कुंद्राला चौकशीसाठी बोलावलं होतं. ही चौकशी सुमारे 2 तास चालली आणि त्यानंतर राज कुंद्राला रात्री अकरा वाजता अटक करण्यात आली. तर आता काल कोर्टात हजर केल्यानंतर अधिक चौकशीसाठी राजच्या कोठडीत 27 जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे.