Punjabi Singer AP Dhillon Firing Outside House : लोकप्रिय इंडो-कॅनेडियन गायक आणि पंजाबी गायक एपी ढिल्लनविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की कॅनडाच्या व्हँकोव्हर या ठिकाणी त्याचं घर आहे आणि त्याच घरावर गोळीबार झाला आहे. त्याची एक पोस्ट सोशल मीडियानर व्हायरल झाली आहे. त्यात एपी ढिल्लनच्या घरावर फायरिंग झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, याविषयी कोणतीही अधिकृत बातमी समोर आली नाही. काही महिन्यांपूर्वी बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या वांद्रे स्थित असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये देखील अशीच फायरिंग झाली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिपब्लिक भारतच्या रिपोर्टनुसार, फायरिंगचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्याचा तपास सुरक्षा एजेंसि करत आहे. सुरक्षा एजेंसीला संशय आहे की या फायरिंगच्यामागे गोल्डी ब्रारच्या गॅंगचा हात आहे. 


एपी ढिल्लनवर का केला हल्ला? 


लॉरेंस बिश्नोई आणि रोहित गोदार गॅंगनं या हल्ल्याची जबाबदारी घेत एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात सलमान खानचा उल्लेख करत त्याच्यासोबतची जवळीकता पाहता त्याच्यावर गोळीबार करण्यात आल्याचं म्हटलं आहे.  


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

एपी ढिल्लनचं पूर्ण नाव अमृतपाल सिंग ढिल्लनआहे. सध्या पंजाबी गाण्यात सगळ्यात लोकप्रिय गायकांमध्ये एपी ढिल्लनचं नाव घेण्यात येतं. एपी ढिल्लनच्या चाहत्यांमध्ये जान्हवी कपूर, अनन्या पांडे ते बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी आहेत. सध्या एपी ढिल्लननं सलमान खान आणि संजय दत्तसोबत एक गाणं केलं असून 'ओल्‍ड मनी' असं त्याचं नाव आहे. इंडो-कॅनेडियन रॅपर आणि गायक एपी ढिल्लनची 5 सोलो गाणी यूके, आशिया आणि पंजाबी चार्टमध्ये टॉपवर आहे. 'मझैल' आणि 'ब्राउन मुंडे' ही गाणी बिलबोर्ड चार्टमध्ये टॉपला होती.


किती आहे शिक्षण?


एपी ढिल्लन हा त्याच्या बॅंडसोबत लेबल 'रन-अप रिकॉर्ड्स' च्या नावाखाली गाणी गातो. एपीचा जन्म हा पंजाबच्या गुरदासपुर जिल्ह्यातील मुल्लियांवालमध्ये एका पंजाबी कुटुंबात झाला. त्यानं अमृतसरच्या बाबा कुमा सिंग जी इंजिनीयरिंग कॉलेजमधून सिविल इंजीनियरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आणि मग कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबियाच्या सानिचमध्ये कॅमोसन कॉलेज ते बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन आणि मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा केला आहे. एपी ढिल्लननं 2019 मध्ये शिंदा कहलोंसोबत 'रन-अप रिकॉर्ड्स' सुरुवात झाली आणि पहिलं गाणं 'फेक' प्रदर्शित केलं होतं. त्यानंतर तो गुरिंदर गिल आणि शिंदा कहलोंच्या 'फरार' व्हिडीओमध्ये दिसला.