मुंबई : सामंथा रूथ प्रभू आणि नागा चैतन्य यांनी घटस्फोटाची घोषणा केली. आता नागाचे वडील आणि साऊथ सिनेसृष्टीचे सुपरस्टार नागार्जुन यांनी या बातमीवर प्रतिक्रिया दिली आहे. नागार्जुन यांनी आपले विधान ट्विटरवर शेअर केले आहे. त्यांनी त्यात लिहिले की, सामंथा आणि चैतन्य यांच्यात जे काही घडले ते अत्यंत दुर्दैवी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही त्या दोघांची वैयक्तिक बाब आहे. नागार्जुन यांची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप वाचली जात आहे.


"हे मी जड अंत: करणाने सांगतो. सामंथा आणि नागा चैतन्य यांच्यात जे काही घडले ते दुर्दैवी आहे. पती -पत्नीमध्ये जे काही घडले ते अतिशय वैयक्तिक आहे. समंथा आणि चैतन्य दोघेही मला प्रिय आहेत. सामंथासोबत घालवलेले क्षण नेहमीच सर्वांसाठी आणि माझ्या कुटुंबांसाठी सर्व खास असेल. देव दोघांनाही आशीर्वाद देवो. नागार्जुन य़ांनी अशाप्रकारे सामंथा रूथ प्रभू आणि मुलगा नागा चैतन्य यांच्या घटस्फोटाच्या बातमीवर आपले मत दिले आहे.


नागा चैतन्य नागार्जुनची पहिली पत्नी लक्ष्मी दग्गुबतीचा मुलगा आहे. 1990 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. नागार्जुनने 1992 मध्ये अभिनेत्री अमलाशी लग्न केले. दोघांना एक मुलगा अखिल आहे, जो एक अभिनेता आहे. सामंथा रूथ प्रभू आणि नागा चैतन्य यांनी लग्नाच्या 4 वर्षानंतर घटस्फोटाची घोषणा केली.



दोघांनी सोशल मीडियावर एक निवेदन शेअर केले आणि विभक्त होण्याची घोषणा केली. लग्नापूर्वी दोघांनी जवळजवळ एक दशक एकमेकांना डेट केले होते. 2017 मध्ये दोघांनी दक्षिण भारत आणि ख्रिश्चन रीतिरिवाजानुसार लग्न केले.