अमिताभ बच्चन यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून भाजप आणि आदित्य ठाकरे यांच्यात का जुंपली? वाचा नेमके काय घडलं
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या त्या पोस्टवर सुरु झालं राजकारण! नक्की काय आहे प्रकरण एकदा पाहाच...
Amitabh Bachchan : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. अशात त्यांनी एक पोस्ट शेअर केली असून त्यावेळी त्यांनी मुंबईच्या कोस्टल रोडीची स्तुती केली. त्यांच्या या पोस्टवरून सोशल मीडियावर वाद सुरु झाला आहे.
अमिताभ यांनी त्यांच्या आधीच्या ट्विटर म्हणजेच आताच्या X अकाऊटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अमिताभ यांनी म्हटलं ती "अरे व्वा. कामासाठी गेलो होतो... त्यानंतर सी लिंकनंतर कोस्टल रोडनं आणि अन्डरग्राऊंड टनलं आलो... JVPD, जुहू ते मरिन ड्राईव्ह असा प्रवास हा अगदी 30 मिनिटात झाला. काय मस्त काम झालंय. स्वच्छ, नवीन रस्ता, कोणताही अडथळा नाही."
अमिताभ यांची ही पोस्ट पाहिल्यानंतर भाजप महाराष्ट्रकडून त्यांना रिप्लाय देण्यात आला आहे. "धन्यवाद अमिताभ बच्चन जी, धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई कोस्टल रोड टनल मधून तुम्ही प्रवास केलात याचा आम्हाला आनंद आहे. देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आणि राज्याचे विकासपुरुष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यामुळेच मुंबईकरांचा प्रवास वेगवान होतोय. भविष्यातदेखील मुंबईकरांना आणि राज्यातील जनतेला उत्तम दर्जाचे रस्ते आणि पायाभूत सोयीसुविधा मिळणार हीच मोदीजींची गॅरंटी."
हेही वाचा : Wedding Bells : 14 वर्षांनी मोठ्या अभिनेत्याशी लग्न करणार शिवांगी जोशी!
दरम्यान, भाजप महाराष्ट्रचं हे ट्वीट पाहिल्यानंतर उद्धवठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे यांनी भाजपचा हा दावा खोडून काढत कोस्टल रोडचं काम सुरु असतानाची घटना सांगत काही फोटो देखील शेअर केले आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोस्टल रोडचं काम किती वेगानं सुरू होतं हे त्यांनी सांगितलं. तर पुढे यात भाजपचं काही योगदान नाही असं देखील ते म्हणाले. "भाजप महाराष्ट्र कोस्टल रोडचं श्रेय घेत आहे हे पाहणं हास्यास्पद आहे. कोस्टल रोडच्या प्रोजेक्टमध्ये भाजपाची कोणत्याही प्रकारची भूमिका नव्हती, त्यांनी या प्रोजेक्टला मंजुरी देण्यासाठी 2 वर्ष घेतले. कोस्टल रोड दक्षिणेकडे जाण्याची घोषणा आणि अंमलबजावणी श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती." भाजपाला नेहमीप्रमाणे सगळीकडेच श्रेय घ्यायचं असतं. पुढे देखील आदित्य ठाकरे यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.