Salman Khan with Mother : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे लाखो चाहते आहेत. तो जिथे कुठे जातो त्याचे चाहते त्याला पाहून आनंदी होतात. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळते. सध्या त्याचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्या व्हिडीओत सलमानचं त्याच्या आईवर असलेलं प्रेम पाहायला मिळतंय. तो त्याच्या आईवर किती प्रेम करतो हे पाहून नेटकऱ्यांना आनंद झाला आहे. त्यासोबत त्याच्या भाचा आहिल आणि भाची आयतसोबत वेळ मस्ती करताना देखील तो दिसला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडीओ सेलिब्रिटी क्रिकेट लीगमधील आहे. जिथे सलमान त्याच्या संपूर्ण कुटुंबासोबत दिसला. त्यावेळी त्यांच्यासोबत काही क्षण घालवताना सलमान दिसला. हा व्हिडीओ स्वत: सलमाननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओला पाहून सोशल मीडियावर त्याची स्तुती करत आहेत. व्हिडीओच्या सुरुवातीला सलमान खान त्याची आई सलमा खान आणि अर्पिता खान, आयुष शर्मा यांची मुलं आहिल आणि आयतसोबत असल्याचे पाहायला मिळत आहे. आई सलमाला पाहताच तो त्यांना एकामागे एक सतत किस करताना दिसतो. त्यानंतर त्याची आई त्याला किस करताना दिसते. तर दोघं मुलं हे स्नॅक्सचा आनंद घेताना दिसतात. त्यानंतर तो आहिल आणि आयतसोबत वेळ व्यथित करताना दिसतो. ते दोघं जे खात आहेत ते सलमानला भरवताना दिसतात. तर त्याच्यासोबत बहीण अर्पिता खान आणि त्याचा भाऊ सोहेल खान देखील दिसतात. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सलमानचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याची स्तुती करण्यास सुरुवात केली आहे. एक नेटकरी म्हणाला, 'सलमानचा स्वभाव सगळ्याच चांगला आहे.' दुसरा म्हणाला, 'तू तुझ्या आईची 10 वर्षाच्या मुलांसारखी काळजी घेतोस ते मला फार आवडतं. त्या गोष्टीचा मी तुझा आदर करतोस.'


हेही वाचा : 'डोकं खराब केलंय, तुम्ही लोक...'; सेल्फी काढण्यासाठी आलेल्या चाहत्यांवर संतापले नसीरुद्दीन शाह


हा व्हिडीओ शारजाहमध्ये असलेल्या सेलिब्रिटी क्रिकेट लीग (सीसीएल) च्या 10 व्या पर्वातील पहिल्या मॅचमध्ये सहभागी होण्याआधीचा आहे. त्याआधी सलमान त्याच्या कुटुंबातील सदस्यांना भेटताना दिसतोय. हा पहिला सामना 'मुंबई हीरोज' आणि 'केरला स्ट्राइकर्स' यांच्यात झाला होता. दरम्यान, सलमानच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तो सगळ्यात शेवटी कतरिना कैफसोबत 'टायगर 3' या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात शाहरुखची पाहुण्या कलाकाराची भूमिका होती. तर सलमान लवकरच 'द बुल' या चित्रपटात दिसणार आहे.