नवी दिल्ली : बॉलिवूडच्या चांदणीचा असा अकालीन मृत्यू हा प्रत्येकालाचा चटका लावून गेला. तिच्या अंतदर्शनासाठी बॉलिवूडकरांसोबत देशभरातील चाहत्यांनी मुंबईच्या स्पोर्ट्स क्लबवर गर्दी केली. असे असताना अमिताभ बच्चनने यांचे ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे. त्यात ते म्हणतात, प्रेम ही सर्वोत्कृष्ट भावना आहे. 


मृत्यूच्या काही वेळापूर्वी केले ट्विट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर श्रीदेवीच्या मृत्यूची बातमी येण्यापूर्वी काही वेळ आधी अमिताभ बच्चन यांनी ट्विट केले होते की, माहित नाही का, पण एक अनामिक भीती दाटून आली आहे. त्यांच्या या ट्विटनंतर काही वेळातच श्रीदेवी यांच्या मृत्यूची वार्ता कानी आली. 



सातत्याने तीन दिवस बीग बींचे ट्विट


त्यानंतर बीग बींनी प्रेमाला महत्त्व द्या, असे ट्विट केले आहे. २५ फेब्रुवारीला त्यांनी ट्विट केले की, प्रेम द्या, प्रेमाचा प्रसार करा, हीच अंतिम भावना आहे.



२६ फेब्रुवारीला त्यांनी ट्विट केले की, प्रेमाकडे परत फिरा... कारण फक्त तेच कायम राहिल.



२७ फेब्रुवारीला पुन्हा प्रेमाचा संदेश देणारे बीग बींचे ट्विट समोर आले आहे. त्यात ते म्हणतात, परत जा.. परत जा.. कृपया परत जा.. प्रेमाकडे...



सिनेमात एकत्र काम


खुदा गवाह या सिनेमात अमिताभ बच्चन आणि श्रीदेवींनी एकत्र काम केले होते. ८ मे १९९२ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमात श्रीदेवीने अप्रतिम भूमिका साकारली होती. यात अमिताभ बादशाह खान यांच्या भूमिकेत होते.