मुंबई : पंजाबी गायक 'सिद्धू मुसेवाला'च्या हत्येची घटना पंजाबमधील जनता विसरलं नसेल तोवरच  आणखी एका गायकावर प्राणघातक हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. या बातमीने संपूर्ण पंजाबी इंडस्ट्री हादरली आहे. अल्फाज असं या गायकाचं नाव आहे. तसंच बॉलिवूड गायक आणि रॅपर हनी सिंगने गायक अल्फाजचा फोटो शेअर करून ही दुःखद बातमी दिली आहे. इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत हनी सिंगने अल्फासच्या हल्लेखोरांचा शोध घेण्याबाबत सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हनी सिंगने हा फोटो शेअर केला आहे
हनी सिंगने सोशल मीडियावर फोटो शेअर करत एक भावनिक चिठ्ठी लिहिली आहे. फोटोत अल्फास हॉस्पिटलच्या बेडवर दिसत आहे. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याने त्याचा एक हातही उशीवर ठेवला आहे. अल्फाची अवस्था अत्यंत वाईट आहे. हनीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'काल रात्री माझा भाऊ अल्फाजवर कोणीतरी हल्ला केला. ज्याने ही योजना आखली होती, त्याला मी सोडणार नाही. कृपया त्याच्यासाठी प्रार्थना करा.


अल्फाज पंजाबचा प्रसिद्ध गायक आहे
आम्ही तुम्हाला सांगतो की अल्फाज एक प्रसिद्ध पंजाबी गायक आहे. याशिवाय तो अभिनेता, मॉडेल, लेखकही आहे. पंजाबी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी अल्फाज लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली आहे. त्याचबरोबर या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे. अल्फाजचा जन्म चंदीगडमध्ये झाला असून त्याचं खरं नाव अनजोत सिंग पन्नू आहे.



त्याने 2011 मध्ये 'हे मेरा दिल' या पंजाबी गाण्याने गायन क्षेत्रात पदार्पण केलं. याशिवाय त्याने बॉलिवूडमध्ये बर्थडे बॅश हे गाणं गायलं आहे. त्याने काही चित्रपटांमध्येही काम केलं आहे. अल्फाजला बालपणी लिरिकल मास्टर म्हणूनही ओळखलं जात होतं. मात्र, अल्फासवर हल्ला करणाऱ्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.