मुंबई : आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर अभिनेता शाहरुख खानचा पहिला फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये शाहरुख खान त्याच्या लीगल  टीमसोबत दिसत आहे. आर्यनच्या अटकेपासून शाहरुख खान मीडियापासून सतत दूर राहत होता. यादरम्यान त्याचा कोणताही फोटो समोर आला नव्हता, पण आज या फोटोवरून शाहरुखच्या आनंदाचा अंदाज लावता येतो. शाहरुख आर्यनला तुरूंगातून बाहेर काढण्यासाठी सतत प्रयत्न करत होता. अखेर प्रयत्नांनंतर आर्यनला गुरूवारी जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे आर्यनची यंदाची दिवाळी 'मन्नत'वर होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


आर्यनच्या सुटकेनंतर व्हायरल होत असलेला फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये शाहरुखसोबत वकिलांची संपूर्ण टीम दिसत आहे.  फोटोमध्ये सर्व दिग्गज वकील आहेत, ज्यांनी आर्यनची कोर्टात मांडण्यासाठी  प्रयत्न केला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे शाहरुख प्रचंड आनंदी दिसत आहे. आर्यनला गुरूवारी  जामीन मिळाला असला तरी आज त्याची तुरूंगातून सुटका होणार आहे. 



दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार आर्थर रोड कारागृह प्रशासनाकडून सायंकाळी 6 वाजता आर्यन खानला जेवण देत असताना त्याला जामीन मिळाल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळाल्यानंतर आर्यनला आनंद झाला आणि त्याने तुरुंगातील कर्मचाऱ्यांचे आभार मानले. सगळ्यांना थँक्यू म्हणत त्यांने आनंद व्यक्त केली. आर्यन घरी परतणार असणार असल्याने आता मन्नतवर देखील आनंदाचं वातावरण आहे.