मुंबई : आयुष्यात काहीतरी वेगळं करून दाखवण्याची इच्छा प्रत्येकाची असते पण आपल्या जिद्दीच्या बळावर ती इच्छा पूर्ण करणारे फार कमी असतात. अशाचं व्यक्तींपैकी एक म्हणजे बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री शशिकला (Shashikala ). आज त्या आपल्यात नाहीत.. पण त्यांच्या कामामुळे आपल्याला प्रेरणा नक्कीचं मिळेल...  शशिकला यांनी गेल्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांच्या यशस्वी करियरबद्दल अनेकांना  माहिती आहे. पण अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी अनेक संकटांचा सामना केला. त्यांनी कुटुंबाची भूक भागवण्यासाठी लोकांच्या घरात धुणीभांडी देखील केली. 



वडिलांचं निधन झाल्यानंतर शशिकला यांच्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. वडिलांच्या निधनापूर्वी त्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम होती. शशिकला यांचे वडील उद्योजक होते. 


त्यामुळे शशिकला यांचं बालपण श्रीमंतीत गेलं. लहानपणापासूनचं त्यांना गायन, नृत्य आणि अभिनयाची आवड होती. त्यांनी अनेक स्टेज शोमध्ये भाग घेत, आपल्या कलेचं जतन केलं. 


पण वडिलांचं निधन झालं आणि कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळलं. त्यामुळे शशिकला कुटुंबासोबत मुंबईत आल्या. पोटाची भूक भागवण्यासाठी त्यांनी धुणीभांडी करण्यास सुरुवात केली. 


याचदरम्यान, त्यांनी नाटक मंडळींसोबत नाटकात काम करण्यास सुरुवात केली. शशिकला सौंदर्य पाहून त्यांना सिनेमांमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. 



शशिकला यांच्यावर नुरजाहाँ यांची नजर पडली. तेव्हा त्या फक्त 11 वर्षांच्या होती. शशिकला यांच्याकडे तिचं एक संधी होती आणि त्या संधीचं त्यांनी सोनं केलं. 


तेव्हा नुकजाहाँ 'झीनत' सिनेमा तयार करत होत्या. ज्यामध्ये मुलीच्या भूमिकेसाठी त्यांनी निवड करण्यात आली. पण भाषेमुळे त्यांची निवड झाली नाही. 


पण नूरजहाँ यांनी शशिकला यांना पती शौकत हुसैन रिझवी यांच्या झीनत सिनेमात कव्वाली सीन मिळवून दिला, त्यानंतर शशिकला यांनी मागे वळून पाहिले नाही. आज त्या आपल्यात नाहीत.. पण त्यांनी केलेलं कार्य अनेकांना प्रेरणा देणारं आहे.