`अभिषेक बच्चनला विसरण्यासाठी करिश्मा कपूरने केलं होतं लग्न?`... घटस्फोटानंतर पतीचे गंभीर आरोप
अभिनेत्री करिश्मा कपूर आणि तिचा माजी पती संजय कपूर यांच्यात घटस्फोटापूर्वी आरोप-प्रत्यारोपांचा काळ सुरू होता.
मुंबई : लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा कपूर आणि तिचा माजी पती संजय कपूर यांच्यात घटस्फोटापूर्वी आरोप-प्रत्यारोपांचा काळ सुरू होता. करिश्मा कपूरने पती संजयवर मानसिक आणि शारीरिक छळाचे आरोप केले होते. तर तिच्या माजी पती संजयनेही तिच्यावर अनेक आरोप केले होते.
अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन सोबतचं लग्न मोडल्यानंतर लोलोने संजयशी लग्न केलं. विभक्त झाल्यानंतर संजयने अभिषेक आणि करिश्माच्या नात्यावरही अनेक आरोप केले होते.
अभिनेत्री करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन 1997 साली एकमेकांच्या जवळ आले आणि अमिताभ बच्चन यांनी 2000 साली त्यांच्या 60 व्या वाढदिवसाला त्यांच्या एंगेजमेंटची घोषणा केली. करिश्माने 2003 मध्ये उद्योगपती संजय कपूर यांच्याशी लग्न केलं. पण हे लग्न फार काळ टिकलं नाही. 2010 मध्ये न्यायालयात प्रदीर्घ लढा दिल्यानंतर 2016 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्याचवेळी संजयने करिश्मावर अनेक गंभीर आरोपही केले होते. करिश्माने पैशासाठी त्याच्याशी लग्न केल्याचा दावा करत संजयने फॅमिली कोर्टात नवी याचिका दाखल केली होती.
तसंच, हा लोलोचा सुनियोजित कट असल्याचं संजयने म्हटलं होतं. तर गरोदरपणात नवरा मारायचा यासगळ्यात सासूनेही मुलाला साथ दिली. त्यामुळेत करिश्मा कपूरने नाराज होऊन त्याला घटस्फोट घेतला असं अभिनेत्रीने सांगितलं.
करिश्मा कपूरने लहानपणापासूनच आयुष्यात संघर्ष पाहिला आहे. रणधीर कपूर आणि बबिता यांच्या विभक्त झाल्यानंतर करीना कपूर आणि करिश्मा यांना त्यांच्या आईने एकट्याने त्यांना वाढवलं. करीना कपूरने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, बालपणी दोन्ही बहिणींना कपूर कुटुंबाकडून कोणतीही मदत मिळाली नाही.
बबिता यांनी दोन्ही मुलींना स्वतःहून वाढवलं. करिश्मा कपूर आपल्या आईचे बलिदान कधीही विसरली नाही आणि यामुळेच ती नेहमीच तिच्या आईच्या जवळ राहिली आहे. करिश्माने बालपणापासून लग्नापर्यंत अनेक वेदना सोसल्या आहेत. संजय कपूरसोबत लग्नानंतर घटस्फोट हा देखील करिश्मासाठी एका वाईट टप्प्यापेक्षा कमी नव्हता. करिश्माने एकदा कपूर बहिणींना त्यांच्या बालपणी झालेल्या त्रासाबद्दल सांगितलं होतं.
करिश्माने समायरा आणि कियानला आपल्यापासून दूर ठेवल्याचा आरोप संजयने केला होता. मुलांचे आजोबा सहा महिने त्यांना भेटण्यासाठी त्रस्त झाले आणि अखेरीस त्यांचा मृत्यू झाला. करिश्माने तिच्यापेक्षा तिच्या करिअरला जास्त महत्त्व दिल्याचं संजयने म्हटलं होतं. अनेक विनवण्या करूनही ती दिल्लीत येण्यास नकार देत होती.