मुंबई : झगमगत्या विश्वात कधी कोणाचं नाव कोणासोबत जोडलं जाईल सांगता येत नाही. तर दुसरीकडे बॉलिवूडमध्ये अनेक प्रसिद्ध जोडप्यांनी घटस्फोट आपला मार्ग वेगळा केला. अशाच सेलिब्रिटी जोडप्यांपैकी एक म्हणजे अभिनेत्री समंथा रुथ प्रभु आणि नागा चैतन्य. जेव्हा  दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. दोघांनी 2017 मध्ये लग्न केलं आणि 2021 मध्ये चार वर्षांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घटस्फोटानंतर समंथा आणि नागा चौतन्य यांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या. दरम्यान, समंथाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. घटस्फोटानंतर समंथाच्या आयुष्याला नवीन कलाटणी मिळणार आहे. अभिनेत्रीच्या चाहत्यांना देखील प्रश्न पडला असेल, नक्की समंथाच्या आयुष्यात काय घडणार आहे? 


दक्षिण इंडस्ट्री गाजवल्यानंतर समंथा बॉलिवूडध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा रंगत आहे. दिनेश विजनच्या मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली निर्माण होणाऱ्या सिनेमातून समंथा पदार्पण करणार असल्याचं समजत आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, आयुष्मान खुराना सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शिवाय तापसी पन्नूने देखील तिच्या होम प्रॉडक्शन पदार्पणाबद्दल स्पष्ट केलं  आहे. ज्यामध्ये सामंथा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, चाहते देखील समंथाला बॉलिवूडमध्ये पाहाण्यासाठी उत्सुक आहेत.