मुंबई : मराठीमध्ये 'चंद्रमुखी' हे नाव सर्वप्रथम वाचलं आणि ऐकलं गेलं ते सुप्रसिध्द लेखक विश्वास पाटील यांच्या लेखणीतून. आता 'चंद्रमुखी' हे नाव पाहताही येणार आहे. लवकरच मोठ्या पडद्याच्या माध्यमातून आपल्याला चंद्रमुखी पाहता येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अक्षय बर्दापूरकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. विश्वास पाटील लिखित 'चंद्रमुखी' ही राजकारण आणि तमाशाची कला यांची उत्तम सांगड घालणारी कादंबरी आहे. तमाशात लावणी सादर करणारी नृत्यांगना, सौंदर्यवती अशा भूमिकेला अगदी सहजपणे शोभून दिसणारी आणि 'चंद्रमुखी'च्या पात्राला अचूक न्याय अमृता खानविलकर देणार आहे. तर दौलतरावच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे दिसणार आहे. 


सिनेमातील चंद्रा या गाण्याने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ पाडली. आपल्या रुपाने आणि घुंगराच्या ठेक्यांनी अनेकांना मोहित करणारी सौंदर्यवती, 'चंद्रमुखी' हे विश्वास पाटील यांच्या कादंबरीतील एक महत्त्वाचं पात्रं. त्यांच्या कादंबरीवर आधारित 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटाचा BTS व्हिडिओ नुकताच अमृता खानविलकरने सोशल मीडियावर शेअर केला आहे.  या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने सेटवर घडलले किस्सेही प्रेक्षकांसोबत शेअर केले आहेत. 


अमृताची 'ती' पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत
व्हिडिओ शेअर करत अमृता म्हणाली, ''माझ्या दिग्दर्शकाला प्रसाद ओकला सगळं ओरिजिनल हवं होतं…. तेव्हा ''अमृता नाक टोचायचं''…. क्लिपवाल्या नथी मी तुला घालू देणार नाही'' असं त्यांनी पहिल्याच मीटिंग मध्ये सांगितलं… आणि म्हणूनच अश्या पद्धतीने मी अडीच वर्षांपूर्वीच नाक टोचलं.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


त्यानंतरही ते बुजलं….दुखलं…..मग परत टोचावं लागलं… पण शूटिंगपर्यंत नथ आणि माझी जुगलबंदी सुरूच राहिली…. त्यात पु.ना, गाडगीळ ह्यांनी खऱ्या सोन्याच्या नथीं केल्या तेव्हा नाचताना त्या इतक्या जड होत असत, कि पॅक-अप नंतर त्यावरचं रक्त आधी कोमट पाण्याने आम्ही काढायचो आणि मग नाथ काढायचो. तर चंद्राची कुठली नथ तुम्हाला जास्त आवडली ओ ?'', असे अमृताने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. तिच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत.