मुंबई : 'ट्युबलाईट' या चित्रपटाकडून सलमान खानला विशेष आशा होत्या पण हा चित्रपट बॉक्सऑफिसवर फारशी कमाल करू शकला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 त्यामुळे आता चित्रपट निवडण्याबाबत सलमान थोडी जास्त खबरदारी बाळगत आहे.


दुबई, अबुधाबी  मध्ये 'टायगर जिंदा है' या चित्रपटाचे चित्रकरण संपवल्यानंतर सलमान कोणत्या चित्रपटाची निवड करणार याकडे त्याच्या रसिकांचे खास लक्ष होते. 'दबंग 3 ' किंवा  रेमो डिसुजा दिग्दर्शित डान्स फिल्म सलमान निवडेल अशी अपेक्षा होती. पण बॉलिवूडलाईफ़ . कॉमच्या बातमीनुसार सलमान लवकरच 'रेस 3' या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरवात करणार आहे. 


अब्बास मस्तान दिग्दर्शित 'रेस 3' मध्ये सलमान सोबत तीन अभिनेत्री दिसणार आहेत. त्यापैकी एक डेझी शहा असेल अशी माहिती मिळाली आहे. 


'दबंग 3', रेमो डिजुझाची डान्स फ़िल्म या सोबतच सलमानकडे 'भरत' हा एक चित्रपट आहे.  सद्ध्या सलमान खान अली अब्बास जफर दिग्दर्शित ' टायगर जिंदा है' हा चित्रपट पूर्ण करण्याच्या गडबडीत आहे. हा चित्रपट ' एक था टायगरचा' सिक्वेल असून यामध्ये सलमान - कॅटरिना ही जोडी रसिकांसमोर येणार आहे.