आधी `बिग बॉस` जिंकला अन् आता लॉटरीत घर लागलं... किंमत ऐकून व्हाल थक्क! शिव ठाकरेचं नशीब जोरावर
Shiv Thakare Wins House Worth Rupees 1.78 Crore in Mumbai : शिव ठाकरेला लागली लॉट्री...
Shiv Thakare Wins House Worth Rupees 1.78 Crore in Mumbai : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या 'बिग बॉस 16' मधून घराघरात पोहोचलेला शिव ठाकरे त्याच्या हटके अंदाजामुळे चांगलाच चर्चेत राहतो. शिव ठाकरे हा अनेक रिअॅलिटी शोमध्ये दिसला आहे. त्याचे लाखो चाहते ही आहेत. सगळ्याच शोमध्ये शिव ठाकरेनं प्रेक्षकांच्या मनावर एक छाप सोडली. आता शिव ठाकरेविषयी मोठी बातमी समोर आली आहे. शिव ठाकरेचं नशिब उजळलं असं म्हणता येईल. त्याचं कारण म्हणजे, त्याला म्हाडा लॉट्री म्हणजेच महाराष्ट्र हाऊसिंग अॅन्ड डेवलपमेंट अथॉरिटीची कोटींची लॉट्री लागली आहे.
शिव ठाकरेला लागलेल्या या लॉट्रीविषयी बोलायचे झाले तर त्याला लागलेली ही लॉट्री तब्बल 1.78 कोटींची असल्याचे म्हटले जात आहे. असं म्हटलं जातय की शिव ठाकरेशिवाय अनेक मराठी सेलिब्रिटींना देखील म्हाडाची लॉट्री लागली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिव ठाकरेला मुंबईच्या पवईमध्ये 1.78 कोटींचं घर लॉट्रीमध्ये लागलं आहे. त्याला हे घर उच्च आय वर्गाच्या श्रेणीत मिळालं आहे. तर त्याच्यासोबत अभिनेत्री गौतमी देशपांडे, अभिनेता निखिल बने आणि गौरव मोरे यांना देखील लॉट्रीमध्ये घर लागलं आहे. निखिल बनेला लागलेल्या लॉट्री विषयी बोलायचं झालं तर त्याला विक्रोळीमध्ये हे घर लागलं आहे तर गौतमी देशपांडेला गोरेगावमध्ये घर लागलं आहे. दरम्यान, शिव ठाकरेविषयी चर्चा सुरु असली तरी देखील त्यानं अजून यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे आता या सगळ्यावर तो काय प्रतिक्रिया देतोय किंवा काय सत्य आहे हे जाणून घेण्यासाठी त्याचे सगळे चाहते उत्सुक आहेत आणि इतकंच नाही तर त्या सगळ्यांना आनंद झाल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा : अखेर 'हेरा फेरी 3' येणार! पण, इतका उशीर का झाला? निर्मात्याला का मोजावे लागले 60 कोटी?
दरम्यान, शिव ठाकरे लवकरच अभिनयाच्या क्षेत्रात त्याचं नशिब आजमावणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्याला अनेक मराठी चित्रपटांची ऑफर मिळाली आहे. पण, दुसऱ्या प्रोजेक्ट्समुळे शिव ठाकरेनं चित्रपटांचा भाग होऊ शकला नाही. शिव ठाकरेच्या कामाविषयी बोलायचं झालं तर 'बिग बॉस 16' शिवाय तो 'झलक दिखला जा 11' आणि 'खतरों के खिलाडी 13' सारख्या रिअॅलिटी शोमध्ये दिसला होता.