Kedar Shinde Daughter Childhood Photo: सेलिब्रेटींच्या लहानपणीचे फोटो हे सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. सध्या अशाच एका सुंदर अभिनेत्रीच्या लहानपणीचा फोटो हा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. यावर्षी केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेल्या 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली होती. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली होती. केदार शिंदे यांची लेक या चित्रपटातून आपल्या भेटीला आली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे तिची सर्वत्र चर्चा रंगलेली होती. 2004 साली आलेल्या 'अग्गं बाई अरेच्चा' या चित्रपटातून तिनं लहान मुलीची भुमिका केली होती. ज्यात ती म्हणते की, 'काका, मीच तुम्हाला म्हणाले वेडा, पण मनातल्या मनात म्हणाले. तुम्हाला कसं कळलं?' असं म्हणत ती डोळा मारते. तेव्हा तिच्या या छोट्याश्या का होईना पण महत्त्वाच्या सीननं ती प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली होती. कारण याच सीननंतर संजय नार्वेकर यांना चित्रपटातून कळते की त्यांना बायकांच्या मनातलं ऐकून येते. 


हेही वाचा : VIDEO: कियारा पडता पडता वाचली... नाहीतर हाय हिल्समुळं नको ते घडलं असतं


अभिनेत्री सना शिंदे ही आता मोठी झाली आहे आणि तिनं आपाल बॉलिवूड डेब्यूही केला आहे. त्यामुळे तिची या वर्षी सर्वत्रच चांगलीच चर्चा होती. सना ही सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. आपले अनेक जुने आणि नवे फोटोज ती सोशल मीडियावरही शेअर करताना दिसते. यावेळी तिनं आपल्या पणजोबांसोबत म्हणजेच शाहीर साबळे यांच्यासोबत एक गोड फोटो शेअर केला आहे. शाहीर साबळेंचे नातू केदार शिंदे यांनी त्यांच्या जीवनावर आधारित 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपटही केला आहे. अकुंश चौधरीनं शाहीर साबळेंची भुमिका केली आहे. यावेळी सनानं शाहीर साबळे आणि त्यांची पत्नी यांच्यासमवेत आपल्या लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. ज्यात ती खूपच गोड आणि निरागस दिसते आहे. शाहीर साबळे यांची शंभरी पुर्ण झाली आहे त्यानिमित्तानं सनानं हा फोटो शेअर केलाय.



सना शिंदेचा 2004 साली आलेल्या 'अग्गं बाई अरेच्च्या' या चित्रपटातील तो सीनही व्हायरल झाला होता. त्यामुळे तिची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगलेली होती. त्यातून बहरला हा मधुमास हे गाणंही तिचे प्रचंड लोकप्रिय झाले होते. त्यामुळे यावेळी तिची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. हे गाणं परदेशातही गाजत होते. त्यामुळे सोशल मीडियावर लोकं या गाण्याचे रिल्स करत होते. हे रिल्सही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत होते.