मुंबई : श्रीदेवी यांच्या मृत्यूनंतर दुबईतल्या मुहाइसनाह स्थित मेडिकल फिटनेस सेंटरनं दिलेलं 'एम्बाल्मिंग सर्टिफिकेट'मुळे आता एक नवा वाद उभा राहिलाय. हा वाद आहे श्रीदेवी यांच्या वयाबद्दल... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचं शरीर अंत्यविधी होईपर्यंत सडण्यापासून वाचवण्यासाठी मृत शरीरावर लेप लावला जातो. या प्रक्रियेला 'एम्बाल्मिंग' म्हटलं जातं. विमान, ट्रेन किंवा जहाजामधून एका राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा एका देशातून दुसऱ्या देशात एखाद्या व्यक्तीचं शव नेणार असतील तेव्हाही ही प्रक्रिया पार पाडली जाते. एम्बाल्मिंग सर्टिफिकेट मिळण्यासोबत दुबईत श्रीदेवी यांच्या मृत्यूनंतर सुरु झालेली कायदेशीर प्रक्रियाही संपली. 


एम्बाल्मिंग सर्टिफिकेटमध्ये, श्रीदेवी बोनी कपूर यांचं वय ५२ वर्ष नोंदविलं गेलंय... तर सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, श्रीदेवी या मृत्यूसमयी ५४ वर्षांच्या होत्या.  


कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर श्रीदेवी यांचं पार्थिव एका ताबूतामध्ये ठेवण्यात आलं आणि अॅम्ब्युलन्समधून ते भारतात पोहचलं. एम्बाल्मिंग सर्टिफिकेटमध्ये या प्रक्रियेला मदत करणाऱ्याचं नाव एन. सिराजुल हक असं नोंदविण्यात आलंय. तर संपूर्ण प्रक्रिया संपल्यानंतर पार्थिव ताब्यात घेणाऱ्याचं नाव अशरफ असं नोंदविण्यात आलंय.