मुंबई : झी मराठीवरील 'अग्गंबाई सासूबाई' Aggabai Sasubai या मालिकेतून 'बबड्या' Babdya म्हणून लोकप्रिय ठरलेल्या आशुतोष पत्कीला Ashutosh Patki  नवा प्रोजेक्ट मिळाला आहे. छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांच मनोरंजन केल्यावर आशुतोष आता मोठ्या पडद्याकडे वळला आहे. लवकरच आशुतोष आपल्याला शहीद भाई कोतवाल Shahid Bhai Kotwal सिनेमात दिसणार आहेत. हा सिनेमा २४ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


ब्रिटिशांविरुद्धच्या सशस्त्र लढ्यात वीरमरण पत्करलेले माथेरानचे भूमिपुत्र विठ्ठल लक्ष्मण उर्फ भाई कोतवाल यांच्या स्मृतिदिनी गुरूवारी त्यांच्या धाडसाला वंदन करणाऱ्या 'शहीद भाई कोतवाल' या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले. 



स्वरजाई आर्ट मीडिया प्रॉडक्शनच्या प्रवीण दत्तात्रेय पाटील, एकनाथ महादू देसले यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. सिद्धेश एकनाथ देसले, सागर श्याम हिंदुराव सिनेमाचे सहनिर्माते आहेत. तर एकनाथ देसले आणि पराग सावंत यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमाचं पहिलं पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलं. 



या सिनेमात त्याच्यासह अभिनेते अरुण नलावडे, गणेश यादव, पंकज विष्णू, कमलेश सावंत, मिलिंद दस्ताने,  सिद्धेश्वर झाडबुके, श्रीरंग देशमुख, अभय राणे, परेश हिंदुराव अभिनेत्री ऋतुजा बागवे, निशिगंधा वाड, माधवी निमकर आदी कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका आपल्याला पहायला मिळणार आहेत.