उगाच नको त्या चर्चा! ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चननं लग्नाच्या वाढदिसानिमित्तानं शेअर केला खास फोटो
Aishwara Rai and Abhishek Bachchan Anniversary : ऐश्वर्या आणि अभिषेकनं लग्नाच्या 17 व्या वाढदिवसानिमित्तानं शेअर केला खास फोटो
Aishwara Rai and Abhishek Bachchan Anniversary : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्याविषयी किती ही चर्चा सुरु असल्या तरी त्याकडे ते कधीही लक्ष देत नाही. काही न बोलता त्यांच्या कृतीनं ते लोकांचं तोंड बंद करतात असं म्हणायला हरकत नाही. काल 20 एप्रिल रोजी ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यानिमित्तानं ते दोघं काही पोस्ट करतील याची प्रतिक्षा चाहते करत होते मात्र, दिवसभर त्यांनी असं काही केलं नाही. तर ऐश्वर्या आणि अभिषेकनं रात्री एक खास फोटो शेअर केला आहे. ते पाहिल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे.
ऐश्वर्या आणि अभिषेक हे 20 एप्रिल 2007 मध्ये लग्न बंधनात अडकले. त्यांच्या लग्नाला आता 17 वर्ष झाले आहेत. तर लग्नाचा 17 वा वाढदिवस साजरा करत असताना त्यांनी आराध्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्यासोबत त्यांनी लाल रंगाचं हार्ट इमोशी देखील कमेंटमध्ये शेअर केलं. तेच अभिषेकनं देखील केलं.
त्यांनी शेअर केलेल्या या फोटोवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात ईशा देओल, बॉबी देओल, रितेश देशमुख, अंकुर भाटिया, डब्बू मिलक, इनायत वर्मा, रणविजय सिंग, लिजेस डिसूजासोबत अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
तर दुसरीकडे आराध्याच्या चाहत्यांनी त्यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी म्हणाला, "आराध्या बच्चन सुंदर दिसते." दुसरा नेटकरी म्हणाला, "तुम्हाला तिघांना एकत्र पाहून आनंद होतोय." तिसरा नेटकरी म्हणाला, "लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमची मुलगी हीरा आहे. भविष्यात ती तुमच्या प्रमाणेच यशस्वी होईल." आणखी एक नेटकरी म्हणाला की "आराध्या ही अभिषेक बच्चनसारखी दिसते."
हेही वाचा : 11 वर्षांपासून दीपिका-रणवीरकडून करीनाला आहे 'या' गोष्टीची प्रतिक्षा!
दरम्यान,ऐश्वर्या आणि अभिषेक यांची जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल्सपैकी एक आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचं नातं हे कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत आहे. असं म्हटलं जातं होतं की त्या दोघांमध्ये चांगलं नाही आणि ते लवकरच घटस्फोट घेणार आहेत. ते दोघं त्यांच्या मुलीमुळे एकत्र आहेत. मात्र, प्रत्येकवेळी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ते दोघं एकत्र स्पॉट होतात आणि एकमेकांवर असलेलं प्रेम हे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दाखवताना दिसतात.