महानायक अमिताभ बच्चन यांची नात आराध्याची दिल्ली हायकोर्टात धाव; तातडीने सुनावणी होणार
Aaradhya Bachchan Fake News Case: आराध्याला अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. बच्चन कुटुंबिय ट्रोलर्सचा सडेतोड उत्तर देत असतात.
Aaradhya Bachchcan Fake News Case: महानायक अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांची नात आणि अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) तसेच ऐश्वर्या बच्चन (Aishwarya Rai Bachchan ) यांची मुलगी आराध्या बच्चन (Aaradhya Bachchan) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आराध्याने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. यावर गुरुवारी तताडीने सुनावणी होणार आहे. विनाकारण पसरवल्या जाणाऱ्या अफवांबाबत आराध्याने कोर्टात धाव घेतली आहे.
11 वर्षांची आराध्या बच्चन नेहमीच चर्चेत असते. आराध्या तिचे आजोबा अमिताभ यांच्यासह आई बाबा अभिषेक आणि ऐश्वर्यासोबत अनेक ठिकाणी हजेरी लावती. आराध्या एक प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक आहे. यामुळे मीडियाचे तिच्याकडे विशेष लक्ष असते.
तातडीने सुनावणी
काही यूट्यूब आणि वेबसाईटवर आराध्याच्या प्रकृतीबाबत अफवा पसरवल्या जात होत्या, त्यावर कारवाई करण्यात आली आहे. बच्चन कुटुंबाने एका यूट्यूब चॅनलवर आराध्याच्या प्रकृतीबाबत चुकीची माहिती शेअर केल्याचा आरोप केला आहे. या अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी यासाठी आराद्याने कोर्टात धाव घेतली आहे. या याचिकेवर 20 एप्रिल म्हणजेच गुरुवारी सुनावणी होणार आहे. आराध्याला अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल केले जाते. बच्चन कुटुंबिय ट्रोलर्सचा सडेतोड उत्तर देत असतात.
आराध्या नेहमी चर्चेत
आराध्या ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक आहे. जिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अनेकदा आराध्या आई ऐश्वर्यासोबत प्रवास करताना दिसते. आई आणि मुलगी दररोज विमानतळावर एकत्र स्पॉट होतात. ऐश्वर्या तसेच अभिताभ बच्चन देखील आराध्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.