Aishwarya Narkar: अनेकदा अभिनेत्री या ट्रोलर्सच्या निशाण्यावर असतात. त्यातील बरेच कलाकार हे त्यांना योग्य ते प्रत्युत्तरही देताना दिसतात. सध्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकरही ट्रोलरच्या निशाण्यावर असतात. अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर या वयातही इतके फीट दिसतात की त्यांचे कौतुक करावे तेवढेच कमी. त्यांच्याकडून आजच्या तरूण पिढीनंही बरंच काही शिकण्यासारखं आहे. परंतु यावरूनही अनेक ट्रोलर्स त्यांना ट्रोल करत सुटतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यांना वारंवार त्यांच्या वयावरून ट्रोलर्स सर्वाधिक ट्रोल करताना दिसतात. किंबहूना अशा ट्रोलर्सना आधी ऐश्वर्या नारकर या दुर्लक्षित करत होत्या परंतु आता मात्र त्या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देताना दिसत आहेत. सध्या त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकांऊटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याखाली एका ट्रोलरच्या खोचक कमेंटवरून त्याला ऐश्वर्या नारकर यांनी योग्य ते उत्तर दिलं आहे. 


सध्या ऐश्वर्या नारकर या 'झी मराठी' वाहिनीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेतून दिसत आहेत. त्यांची बरीच चर्चाही रंगलेली आहे. त्यांच्या भुमिकेलाही प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. यावेळी ही मालिकाही फार लोकप्रिय झाली आहे. नुकताच झी मराठी अवोर्ड हा पुरस्कार सोहळा पार पडला. ज्यात ऐश्वर्या नारकर यांनी सुंदर असा डान्सही केला होता. त्या उत्कृष्ट अभिनेत्री तर आहेतच परंतु त्यांच्या डान्सही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी त्यांनी या अवोर्ड फंक्शनमधला एक बीटीएस व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्याची चर्चा आहे. परंतु एका ट्रोलरनं मात्र विचित्र कमेंट केली आहे.


हेही वाचा : 'तिखट झेपत नाही तर...' हॉटेलमधले नियम वाचून खवय्यांच्या तोंडचं पाणी पळालं


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


यावेळी त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'डान्स करणं हा खरंच एक संघर्ष आहे.' त्यावर एका ट्रोलरनं खाली म्हटलं आहे की, 'म्हातारपणात तुम्हाला डान्स करणं किती कठीण जात असेल ना'. ट्रोलरच्या या कमेंटखाली ऐश्वर्या यांनी सडेतोड उत्तर दिलं. त्या म्हणाल्या. 'तुम्ही तर करूनही नका'. सध्या त्यांच्या या कमेंटखालीही अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. 



ऐश्वर्या नारकर यांच्या या व्हिडीओखाली अनेकांना कौतुकाच्याही कमेंट्स केल्या आहेत. परंतु या कमेंटनं त्यांच्या चाहत्यांनाही राग आला आहे. ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावरही त्यांना ते फॉलो करतात. मराठी मालिका, टेलिव्हिजन, जाहिराती यांमध्ये त्या दोघांनीही अनेक वर्षे उत्तमोत्तम भूमिका केल्या आहेत.