मुंबई : अनिल कपूर आणि ऐश्वर्या रायचा 'फन्ने खान' हा सिनेमा 3 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. सिनेमा प्रदर्शित होण्याअगोदर सिनेमातील कलाकार जोरदार प्रमोशन करत आहेत. मग रिअॅलिटी शो असू दे किंवा पत्रकार परिषद सगळीकडून फन्ने खान या सिनेमाचं प्रमोशन सुरू आहे. 'फिर भी दिल है हिंदुस्तानी' च्या सेटवर फन्ने खानचे मुख्य कलाकार अनिल कपूर प्रमोशनसाठी पोहोचले होते. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडिओत फन्ने खानची लीड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन अतिशय रागात दिसत आहे. या व्हिडिओत तिच्या रागाचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. व्हिडिओमध्ये ऐश्वर्या राय बच्चन कुठच्या बाजूला जायचं हे कळत नाही असं काही तरी पुटपुटत गेली. व्हिडिओत ती एकटी कलाकार दिसत आहे. तिच्या आजूबाजूला मीडियातील लोकं आहे. तिला नेमकं कुठे जायचं हे कळत नसल्यामुळे गोंधळ झाला आहे.



'फन्ने खान' हा सिनेमा एक म्युझिकल कॉमेडी सिनेमा आहे. हा सिनेमा बाप - लेकीच्या कथेवर आधारित आहे. एक बाप आपल्या मुलीच्या स्वप्नासाठी कसे प्रयत्न करतो हे या सिनेमांत पाहायला मिळणार आहे.