पार्ट्यांमध्ये एकटी का पडली बच्चन घराण्याची सून? विभक्त झाल्याची उठली चर्चा
ऐश्वर्या राय बच्चनने मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत तिच्या जबरदस्त लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. ऐश गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती.
मुंबई : नुकतीच डिझाईनर मनिष मल्होत्राने दिवाळी ग्रॅण्ड पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. ऐश्वर्या राय बच्चनने मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत तिच्या जबरदस्त लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. यावेळी ऐशने गुलाबी रंगाचा खूपच सुंदर ड्रेस परिधान केला होता. ती या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. चाहत्यांनी तिच्या लूकची आणि सौंदर्याची भरभरुन प्रशंसा केली.
ऐश्वर्या राय बच्चनने मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत तिच्या जबरदस्त लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. ऐश गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. खरतर पार्टीत ऐश्वर्या एकटीच उपस्थिती लावताना दिसली. अशा परिस्थितीत बच्चन कुटुंबीयांच्या अनुपस्थितीवर नेटकऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बऱ्याच दिवसांपासून ऐश्वर्या एकटी किंवा मुलीसोबत मीडियासमोर दिसत आहे. अशा परिस्थितीत जेव्हा हे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर येतात तेव्हा लोक प्रश्न उपस्थित केले की, ऐश आता बच्चन कुटुंबासोबत राहत नाही का? याचबरोबर नेटकऱ्यांनी ऐश आणि अभिषेकमध्ये दुरावा आला असल्याचंही म्हटलं आहे.
डिझायनर मनीषा मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत ऐश्वर्या एकटीच एंट्री करत असल्याच्या व्हिडिओला भरपूर कमेंट्स मिळत आहेत आणि चाहत्यांना प्रश्न पडत आहे की बच्चन कुटुंब कुठे आहे. यावर्षी ऐश्वर्याने पार्टीला हजेरी लावली आणि अभिषेक बच्चन का नाही. असे प्रश्न या व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये युजर्स करताना दिसत आहेत. या दोघांमध्ये नक्कीच काही बिनसलं आहे असा अंदाजही युजर्सकडून बांधला जात आहे. एका यूजरने कमेंट केली की, 'ती आजकाल अभिषेकसोबत का दिसत नाही?' तर आणखी एका युजरने म्हटलं की, "शेवटी मुलगी ईथे तरी नाही." ऐश्वर्याला अनेकदा ट्रोल केलं जातं याचबरोबर तिला कंट्रोलिंग आई म्हटलं जातं.
अगस्त्य नंदा, सुहाना खान आणि द आर्चीजची संपूर्ण टीम मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत सहभागी होण्यासाठी पारंपारिक पोशाखात आली होती. सुहाना खान खूपच सुंदर दिसत होती. असं म्हटलं जातं की, अगस्त्य आणि सुहाना डेटिंग करत आहेत. ते एकमेकांना लहानपणापासून ओळखत असल्याने ते चांगले मित्र आहेत. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी या पार्टित हजेरी लावली होती.