मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन 1 नोव्हेंबर रोजी आपला 45 वा वाढदिवस साजरा करत आहे. कर्नाटकच्या मंगलौरमध्ये जन्मलेली ऐश्वर्या राय अभिनेत्री होण्याऐवजी आर्किटेक्ट होणार होती. मात्र एक मॉडेल म्हणून तिने आपल्या करिअरला सुरूवात केली. मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर ऐश्वर्याने ताल, हम दिल दे चुके सनम, धुम, गुरू आणि रोबोट सारखे हिट सिनेमे दिले. 2007 मध्ये ऐश्वर्याने अभिषेकला लग्नाकरता प्रपोज केलं. जाणून घेऊया तिच्यातील काही इंटरेस्टींग गोष्टी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐश्वर्याचे वडिल कृष्णराज हे बायोलॉजिस्ट होते. तर आई वृंदा राय हाऊस वाइफ होता तर भाऊ आदित्य मर्चेंट नेवीत होता. शालेय काळात तिचं कुटुंब मंगलौरमधून मुंबईत शिफ्ट झाले. ऐश्वर्याला आर्य विद्या मंदिर हायस्कूलमध्ये अॅडमिशन घेण्यात आलं. त्यानंतर तिने एक वर्ष जय हिंद कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं. त्यानंतर डीजी रुपारेलमध्ये अॅडमिशन घेतलं. 



शिक्षणानंतर ऐश्वर्या रायचा फेव्हरेट सब्जेक्ट म्हणजे जूलॉजी, तिला मेडिकल लाइनमध्ये करिअर करायचं होतं. मात्र नंतर तिने आर्किटेक्ट होण्याचा निर्णय घेतला. याकरता तिने रचना संसद अॅकेडमीचा विचार केला पण मॉडलिंगमध्ये करिअर करण्याच्या उद्देशाने तिचं शिक्षण मागेच राहिलं. 


1991 साली ऐश्वर्या सुपरमॉडेल कॉन्टेस्ट जिंकली. फोर्डकडून आयोजित केलेल्या या स्पर्धेत जिंकल्यानंतर तिला वोग मॅगझीनच्या अमेरिकन एडिशनमध्ये स्थान मिळालं. 


त्यानंतर 1993 मध्ये अभिनेता आमीर खानसोबत एका पेप्सीच्या जाहिरातीमध्ये येऊन ऐश्वर्या एका रात्रीत लोकप्रिय झाली. 1994 मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर एका रात्रीत ऐश्वर्या लोकप्रिय झाली. 


तर 1997 साली मणिरत्नम यांच्या तामिळ सिनेमा 'इरूवर'मधून तिने सिनेजगतात पाऊल ठेवलं. या सिनेमात तिने डबल रोल केला होता. तामिळ भाषा माहित नसल्यामुळे दुसरी अभिनेत्री तिचे डायलॉग डबिंग करत असे. 


त्यानंतर तिने 'और प्यार हो गया' या सिनेमातून बॉबी देओलसोबत बॉलिवूडमध्ये कास्ट केलं. या दोन्ही सिनेमांत ऐश्वर्याच्या अभिनयाचं कौतुक झालं. यानंतर ऐश्वर्याने हिंदीबरोबरच तामिळ, तेलुगु, बंगाली आणि इंग्रजी भाषेत अनेक सिनेमे केले. 


सलमान खान - ऐश्वर्याची जोडी 


2000मध्ये आलेल्या संजय लीला भन्साळीच्या 'हम दिल दे चुके सनम' हा सिनेमा ऐश्वर्याच्या करिअरला कलाटणी देणारा सिनेमा ठरला. या सिनेमानंतर सलमानला देखील कौतुक ऐकायला मिळालं. या सिनेमामुळे दोघांची जवळीक वाढली पण 3 वर्षांनतर हे नातं तुटलं. या दोघांनी तीन सिनेमांत एकत्र काम केलं. 1999 मध्ये हम दिल दे चुके सनम, 2000 मध्ये ढाई अक्षर प्रेम के, 2002 मध्ये हम तुम्हारे है सनम 



ऐश्वर्या - अभिषेकमध्ये जवळीक 


मणिरत्नम यांच्या 'गुरू' सिनेमाच्या शुटिंग दरम्यान ऐश्वर्याने अभिषेकला लग्नाकरता प्रपोज केलं. या सिनेमाच्या रिलीज नंतर दोघांनी लग्न केलं आज त्यांना 6 वर्षांची मुलगी आहे.