Aishwarya Rai : अभिषेकआधी ऐश्वर्यानं पती म्हणून कोणाला निवडलेलं? लग्नही झालेलं तुम्हाला माहिती आहे का?
Happy Birthday Aishwarya Rai: मिस वर्ल्ड ते बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीपर्यंत प्रवास तिचा खूप खडतर होता. शिवाय तिचं पसर्नल लाईफ सलमान खान (Salman Khan) असो किंवा विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) यांच्यासोबतचं तिचं नातं...हा सगळा प्रवास तिच्यासाठी कठीण होता. त्यानंतर अभिषेक बच्चनसोबत तिचा लग्न होणं हे चित्रपटसृष्टीसह सगळ्यांसाठी आश्चर्यकारक होतं. असं म्हटलं जातं की अभिषेक बच्चन पूर्वी ऐश्वर्याचं लग्न झालं होतं.
Aishwarya Rai Birthday : बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood actress), बच्चन कुटुबांची सून , सौंदर्यवती मिस वर्ल्ड (Miss World) ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) हिचा आज वाढदिवस (Birthday). बच्चन कुटुंबासोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी सोमवारी ऐश्वर्या राय बच्चन मुलगी आराध्यासोबत (Aaradhya Bachchan) मुंबईत (Mumbai) परत आली. ऐश्वर्या आपल्या 49 वा वाढदिवस साजरा (Aishwarya Rai Bachchan turns 49) करणार आहे. मिस वर्ल्ड ते बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीपर्यंत प्रवास तिचा खूप खडतर होता. शिवाय तिचं पसर्नल लाईफ सलमान खान (Salman Khan) असो किंवा विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) यांच्यासोबतचं तिचं नातं...हा सगळा प्रवास तिच्यासाठी कठीण होता. त्यानंतर अभिषेक बच्चनसोबत तिचा लग्न होणं हे चित्रपटसृष्टीसह सगळ्यांसाठी आश्चर्यकारक होतं. असं म्हटलं जातं की अभिषेक बच्चन पूर्वी ऐश्वर्याचं लग्न झालं होतं.
अभिषेकसोबत दुसरं लग्न
ऐश्वर्या राय ही बॉलिवूड सुपरस्टार मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची सून होणार म्हटल्यावर या लग्नाकडे सर्व जगाचं लक्ष लागलं होतं. 2007 मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जुहूमधील बंगाल्यात हा विवाहसोहळा झाला होता. या लग्नाविषयी जाणून घेण्यासाठी मीडियासोबतच चाहते ही उत्सुक होते. त्यामुळे एक बातमी समोर आली होती की, ऐश्वर्या राय बच्चन हिच्या कुंडीत मंगळ दोष ( mangal dosh) आहे. त्यामुळे अभिषेक बच्चन सोबत लग्न करण्यापूर्वी तिचं लग्न पिंपळाच्या झाडासोबत (aishwarya rai bachchan married with tree) लावण्यात आलं होतं. या बातमीनंतर बच्चन कुटुंबासोबतच ऐश्वर्या राय बच्चनला या प्रश्नाचा सामना करावा लागला. सगळ्यात धक्कादायक ते होतं जेव्हा ऐश्वर्या राय विदेशात गेली असताना तिथे देखील तिला या प्रश्नाला सामोरे जावं लागलं होतं. (aishwarya rai bachchan Birthday Married with before abhishek bachchan nmp)
अशी पण एक अफवा पसरली होती...
या लग्नाची अजून एक गोष्ट आहे. असं म्हटलं गेलं होतं की, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचं वाराणसीमध्ये कुंभ विवाह झाला होता. 2006 मधील हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार एका ज्योतिषाने सांगितलं होतं की, या दोघांचं लग्न वारासणीतील एका प्राचीन शिव मंदिरात सुधारात्मक पूजेनुसार करण्यात आलं होतं.