आजीच्या वाढदिवसाला खास लूकमध्ये दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या पोस्टमध्ये अभिषेक न दिसल्यानं नेटकरी पेचात
Aaradhya`s look in Aishwarya`s Mother Birthday Celebration : ऐश्वर्याच्या आईच्या वाढदिवसात आराध्याचा नवा लूक... तर अभिषेकची अनुपस्थिती...
Aaradhya's look in Aishwarya's Mother Birthday Celebration : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायनं काल 23 मे रोजी आई वृंदा रायचा वाढदिवस साजरा केला. त्याशिवाय तिच्यासाठी एक खास सरप्राइज देखील ठेवलं. त्याशिवाय ऐश्वर्यानं या सेलिब्रेशनचे खास फोटो देखील शेअर केले आहेत. पण यावेळी ऐश्वर्यासोबत तिचा पती अभिषेक बच्चन दिसला नाही. त्यावरून अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. तर दुसरीकडे आराध्याची यावेळी एक वेगळी हेअर स्टाईल पाहायला मिळाली आहे. त्याची देखील वेगळीच चर्चा सुरु आहे.
ऐश्वर्यानं हे सगळे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. यात तिची आई वृंदा आणि काही नातेवाईक दिसत आहेत. आराध्या देखील यावेळी दिसली. आराध्या या फोटोत तिच्या आजीच्या मागे उभी आहे. तर या फोटोत दिसतंय की वृंदा यांच्यासमोर दोन केक, फूलं आणि ऐश्वर्याच्या वडिलांचा फोटो आहे. ऐश्वर्यानं एका फोटोत तिच्या तिच्या वडिलांचा फोटो हातात पकडला आहे. ऐश्वर्यानं हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करत "हॅपी बड्डे डार्लिंग आई आणि बाबा. तुमच्यावर खूप प्रेम आहे."
ऐश्वर्यानं शेअर केलेल्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी ऐश्वर्याच्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी अभिषेक बच्चन का दिसत नाही असं म्हटलं आहे. ऐश्वर्यानं या पोस्टवर कमेंट करत विचारलं की 'अभिषेक बच्चन कुठे गायब आहे.' ऐश्वर्याच्या पोस्टवर काही चाहत्यांनी कमेंट केली आहे की अ'भिषेक बच्चन त्याच्या सासूच्या वाढदिवसाला का आला नाही?' इतकंच नाही तर अभिषेकनं वृंदा यांच्या वाढदिवसाच्या पोस्टवर कोणतीही कमेंट केलेली नाही. तर एक नेटकरी म्हणाला की नक्की काय सुरु आहे ऐश्वर्याच्या आईच्या वाढदिवसाला अभिषेकनं का हजेरी लावली नाही...
दरम्यान, 2023 मध्ये ऐश्वर्याच्या आईच्या वाढदिवसाच्या दिवशी देखील अभिषेक उपस्थित नव्हता. त्याच्याआधी तो नेहमीच वाढदिवसाच्या दिवशी असलेल्या सेलिब्रेशनमध्ये दिसला. ऐश्वर्या यावेळी कान्समध्ये गेली तेव्हा सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं. त्याचं कारण म्हणजे ऐश्वर्याचा हात फ्रॅक्चर होता. तरी अभिषेक हा त्याची पत्नी ऐश्वर्यासोबत कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये देखील दिसला नाही. ऐश्वर्याला विमानतळावर देखील आराध्या सांभाळताना दिसली.